Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता

admin
Last updated: 2025/05/05 at 5:24 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 5 मे (हिं.स.) :तक्रारदारांना त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज दाखल केलेला होता. सदरचा अर्ज प्रत्यक्षरीत्या देण्यासाठी तक्रारदार हा सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात गेला असता, तेथील कार्यरत शिपाई मच्छिंद्र भांडेकर यांनी तक्रारदाराची कागदपत्रे पाहून ती दाखल करून घेण्यासाठी व लवकरात लवकर काम करून देण्यासाठी म्हणून तक्रारदाराकडे रक्कम रु. 15,000 लाचेची मागणी केली होती.

त्याबाबत तक्रारदाराने आरोपी भांडेकर यांच्याविरुद्ध सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार दाखल केलेली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार शासकीय पंचांसमक्ष आरोपीकडून करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. आरोपी भांडेकर यांनी तक्रारदाराच्या मुलीचे जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर करून देण्यासाठी रक्कम रु. 15,000 लाचेची मागणी करून तडजोडीअंती लाच रक्कम रु. 7,000 स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झालेले होते.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार व कागदपत्रांच्या आधारे आरोपी मच्छिंद्र भांडेकर यांनी लाचेची मागणी केल्यासंदर्भातील कोणताही ठोस व सबळ पुरावा आलेला नसून साक्षीदारांच्या जवाब अनेक महत्त्वपूर्ण विसंगती व त्रुटी असल्याचे, तसेच आरोपीस तक्रारदाराचे कोणतेही काम करून देण्याचे अधिकार नसल्याचे माहित असताना देखील केवळ कायदेशीर प्रक्रियेस बगल देऊन तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी तक्रारदाराने आरोपी भांडेकर यांना खोटेपणाने गुंतविण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

You Might Also Like

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार

उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी

सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख

जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी

सोलापूरच्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पाच लाखांची सोन्याची तुळशी माळ
Next Article वळसंगकर आत्महत्या प्रकरण : सून आणि तिचे वडील बेपत्ता

Latest News

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार
सोलापूर May 20, 2025
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
सोलापूर May 20, 2025
सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
सोलापूर May 20, 2025
जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी
सोलापूर May 20, 2025
मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले
देश - विदेश May 20, 2025
अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान
देश - विदेश May 20, 2025
भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी
देश - विदेश May 20, 2025
अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Hot News May 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?