Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरला अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी 250 कोटींचा निधी प्राप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरशिवार

सोलापूरला अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी 250 कोटींचा निधी प्राप्त

Surajya Digital
Last updated: 2021/01/09 at 5:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूरसह महाराष्ट्रात जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत अतिवृष्टीने महापूर आला. त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी राज्य सरकारच्या वतीने मदतीचा दुसरा व अंतिम हप्ता जाहीर करण्यात आला आहे. या दुसऱ्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला 250 कोटी 71 लाख 82 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

राज्य सरकारच्या महसूल विभागाने गुरुवारी राज्यासाठी 2 हजार 192 कोटी 89 लाख रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी 250 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यात सध्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. नुकसानीच्या मदतीचे वाटप करण्यासाठी हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळविले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तरीही ही मदत वाटप करताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना महसूल व वन विभागाने त्या – त्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.  एसडीआरएफच्या दरानुसार व वाढीव दरानुसार शेती पिकांसाठी हेक्‍टरी 10 हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्‍टरी 25 हजार रुपये या प्रमाणे मदत केली जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीसाठी 503 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली होती. पहिल्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला 251 कोटी तर दुसऱ्या हप्त्यात 250 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याने शेतीच्या नुकसानीसाठी जेवढी मागणी राज्य सरकारकडे केली होती, जवळपास तेवढा निधी सरकारकडून सोलापूर जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूरला #अतिवृष्टीग्रस्त #शेतक-यांसाठी #250कोटींचा #निधी #प्राप्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भंडारा जिल्हा रूग्णालयातील धक्कादायक माहिती, यामुळेच गेला १० नवजात बालकांचा बळी
Next Article नवजात बालकांच्या दुर्दैवी मृत्यूस महाराष्ट्र सरकार जबाबदार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?