सोलापूर, 4 मे (हिं.स.)।
भाळवणी (ता. माळशिरस) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यासोबत उसतोडीचा करार करूनही त्याचे उल्लंघन करून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
देविदास विठ्ठल तरडे व राणी देविदास तरडे (दोघेही रा. बजरंग वस्ती, कचरेवाडी रोड, माळशिरस) या दोघांनी ऊस तोडून ट्रॅक्टरमधून कारखान्याला पोच करण्यासाठी पाच लाख रुपये घेतले होते. त्यानंतर यशवंत बाळासाहेब लवटे (रा. मेडद, ता. माळशिरस) याने देखील पाच लाख रुपये घेतले. कारखाना सुरू झाल्यावर त्यांनी करारपत्रानुसार काम करणे अपेक्षित होते.