Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । दारुच्या नशेत पत्नीला घेऊन पतीही विहिरीत बुडाला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । दारुच्या नशेत पत्नीला घेऊन पतीही विहिरीत बुडाला

Surajya Digital
Last updated: 2023/07/16 at 4:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सांगोला : सोलापूरच्या सांगोल्यामधील घेरडी मेटकरवाडी येथे दारूच्या नशेत नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. तसेच त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. सिध्दराम कारंडे आणि सोनाली कारंडे असे मृतकांची नावे आहेत. Solapur. Sangola Gherdi took his drunken wife and drowned in the well किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावरून दारूच्या नशेत असलेल्या सिध्दरामने सोनालीला शेतातील विहीरीत ढकलले आणि नंतर स्वत: विहिरीत उडी मारत जीवन संपवले.

पती-पत्नीच्या झालेल्या वादात व दारूच्या नशेत पतीने पत्नीला विहिरीत ढकलून देऊन स्वतः ही विहिरीत बडून पती- पत्नी मृत्युमुखी पडल्याची घटना मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला) येथे घडली आहे. या घटनेमध्ये सिध्दाराम सुभाष कारंडे (वय २८) व सोनाली सिद्धाराम कारंडे (वय २५, रा. मेटकरवाडी, पेरडी ता. सांगोला) हे पती पत्नी मृत्युमुखी पडले आहेत. लक्ष्मण बाबू आलदर (रा. मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराशेजारी त्यांच्या मेहुण्याचा मुलगा सिध्दाराम सुभाष कारंडे हा त्याची पत्नी सोनाली, तीन मुली असे त्याची आजीसह राहत होता. सिध्दाराम यास दारू पिण्याचे व्यसन होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

दिनांक १३ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारावरून शेजारी राहणारी सोनाली कारंडे हे त्यांच्या शेतात गेलेली दिसली. त्यानंतर त्याच्या पाठीमागून सिध्दाराम हाही गेला. त्यावेळेस तो दारू पिलेला होता. पती-पत्नीमध्ये वाद चालू होता. थोड्या वेळाने फिर्यादीही त्यांच्या पाठीमागे गेला असता सिध्दाराम हा सोनाली हिला शेतातील विहिरी जवळच मारहाण करत होता.

या वादातच सिध्दाराम यांनी त्याची पत्नी सोनालीला विहिरीत ढकलून दिले. यावेळी फिर्यादीने पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस सिध्दाराम याने विहिरीत उडी मारली व आपल्या पत्नीचा पाय ओढून विहिरीतील पाण्यामध्ये नेले. फिर्यादीने आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीच्या कडेवर आला. परंतु या वेळेमध्ये सिध्दाराम याने आपल्या पत्नीला पाण्यात बुडवले व स्वतःही बुडून दोघांचा मृत्यू झाला.

विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे फिर्यादीलाही वर येता येत नव्हते. सायंकाळी सातच्या सुमारास लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकल्यानंतर फिर्यादी लक्ष्मण आलदर यांनी विहिरीतून आवाज दिला. आवाजावरून लोकांनी फिर्यादीस व पती- पत्नीचे प्रेतं विहिरीबाहेर काढले. या घटनेची फिर्याद लक्ष्मण अलदर यांनी सांगोला पोलिसात दिली आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Solapur #Sangola #Gherdi #took #drunken #wife #drowned #well, #सोलापूर #सांगोला #घेरडी #दारु #नशा #पत्नी #पती #विहिरीत #बुडाला #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर लोकसभेसाठी सुशीलकुमारांनी दिले मुलगी प्रणिती शिंदेंच्या नावाचे संकेत
Next Article विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला : सर्व 9 मंत्र्यांनी शरद पवारांचे घेतले आशिर्वाद, दोन्हीकडून आल्या प्रतिक्रिया 

Latest News

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल
महाराष्ट्र May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
महाराष्ट्र May 30, 2025
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
देश - विदेश May 30, 2025
भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?