Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग ई ऑफिस प्रणालीत राज्यात नंबर वन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग ई ऑफिस प्रणालीत राज्यात नंबर वन

admin
Last updated: 2025/05/05 at 5:15 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 5 मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्यात ई ऑफिस कार्य प्रणालीत सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग अव्वल ठरला आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे कौतुक केले आहे. कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व गतिमानता वाढविण्यासाठी एक मे पासून माध्यमिक शिक्षण विभागात कोणतीही फाईल स्वीकारली जाणार नसून ईमेलवरूनच सर्व प्रस्ताव घेतले जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले.सर्व शासकीय कार्यालयाचा कारभार गतिमान करण्यासाठी ई ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करा, असे शासनाने आदेश दिले आहेत.

जानेवारी 2025 पासून जिल्हा परिषदेत ई ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे विभागाकडून कामकाज होत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी 22 एप्रिल रोजी परिपत्रक काढून सर्व विभागांना ई ऑफिस कार्यप्रणालीचे कामकाज वाढविण्याचे आदेश दिले आहेत.

ई ऑफिस कार्यप्रणाली प्रभावीपणे राबविल्याने प्रशासनात गतिमानता येणार आहे. प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पारदर्शक व कामकाजात सुसूत्रता, दस्तऐवज व माहिती सुरक्षित, त्वरेने प्राप्त होऊन, निर्णय प्रक्रिया सुलभ होऊन प्रकरणे निकालीत काढण्यास गतिमानता येणार आहे. त्यामुळे ई-मेलचा वापर करून ई ऑफीस कार्य प्रणालीचा वापर सक्तीने करण्यात यावा. पत्रव्यवहार, सर्व प्रकरणे, विकास कामे, देयके, वैद्यकीय बिले, सेवा पुस्तके, नसती या सर्व बाबी ई ऑफिस कार्यप्रणालीत नोंद झाल्यानंतरच स्वीकारण्यात याव्यात, असे सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले आहे.—————-

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विरोधकांना फोडण्याचं जे भाजप प्रयत्न करतोय, त्याचा आम्ही निषेध करतो – सपकाळ
Next Article सोलापुरच्या तापमानात घट

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?