Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: यवतमध्ये सोलापुरातील व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून, तपास सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

यवतमध्ये सोलापुरातील व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून, तपास सुरू

Surajya Digital
Last updated: 2022/07/28 at 6:38 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ भोगाव येथील गोदाम फोडून अंगणवाडीचे धान्य पळविले

सोलापूर : यवत येथे संत तुकाराम महाराज पालखी तळाच्या सभागृहात एका ४७ वर्षीय पुरुषाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून झाला आहे. तो व्यक्ती सोलापूर शहरातील आहे. Murder of a person from Solapur with a sharp weapon in Yawat, investigation underway

काल बुधवारी (दि.२७ ) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंदिराच्या समोरच असलेल्या पालखी तळावर रात्री उशिरा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

संजय सखाराम बनकर (वय ४६, रा. मुरारजी पेठ, चिंचनगर, सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतांची पत्नी मनीषा संजय बनकर (रा. खामगाव, तांबेवाडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी यवतचे पोलीस दाखल झाले.

बनकर यांची पत्नी मनीषा हिचे माहेर खामगाव , तांबेवाडी (ता. दौंड) येथिल असून ती मागील काही वर्षांपासून माहेरी राहत होती. संजय बनकर सोलापूर येथे त्यांच्या आईकडे राहत होता. मात्र अधून मधून तो त्याच्या पत्नीकडे येत असे. मागील तीन ते चार दिवसांपूर्वी तो सोलापूर येथून आला होता.

https://www.facebook.com/109399567404448/posts/590725242605209/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

बुधवारी सकाळी यवत येथील पालखी तळात एका व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे व पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. संबंधित व्यक्ती मृत झाल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या पोटात धारदार शस्त्राने तीन ते चार वार केल्याचेही आढळून आले.

मिळालेल्या मोबाईल वरून त्याची ओळख पटवण्यास मदत झाली. खून झालेल्या व्यक्तीचा मोबाईल व इतर पुराव्यांवरून मारेकऱ्यांचा तपास यवत पोलिसांनी सुरु केला. मध्यरात्री १२ ते ४ दरम्यान खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

यवत येथील महालक्ष्मी मातेची आखाड यात्रा प्रचंड मोठी आणि प्रसिद्ध असून मुंबई, पुणे सह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी व यात्रेसाठी येत असतात. आषाढी एकादशी झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी येथे मोठी यात्रा भरते. काल रात्रीच्या वेळी गर्दी असताना मंदिरासमोरील बाजार मैदानात पालखी तळ मध्ये खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

□ भोगाव येथील गोदाम फोडून अंगणवाडीचे धान्य पळविले

सोलापूर – भोगाव (ता.उत्तर सोलापूर) येथील गोदामात ठेवलेले ८० हजाराचे धान्य चोरट्याने पळविले. ही चोरी रविवारी ( २४ जुलै) दुपारच्या सुमारास घडली. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजनेतील धान्य आणि कडधान्य वैभव भगवान देवकर (रा.इंदापूर) यांनी भोगावच्या गोदामात ठेवले होते.

रविवारी दुपारच्या सुमारास चोरट्याने गोदामाचे शटर उचकटून त्यातील ८० हजार रुपये किमतीचे धान्य चोरून नेले. या चोरीची नोंद तालुका पोलिसात झाली. हवालदार देवकर पुढील तपास करीत आहेत.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/590460762631657/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Murder #person #Solapur #sharp #weapon #Yawat #investigation #underway, #यवत #सोलापूर #व्यक्ती #धारदार #शस्त्र #खून #तपास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा
Next Article घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात भ्रष्टाचार; कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?