सोलापूर : शेतकरी विरोधातील कृषी कायदा रद्द करावेत व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आगोदर ऊसदर (एफ. आर. पी.) जाहीर करावा व मगच हंगाम सुरू ठेवावा, तसेच मागील गळित हंगामांमधील थकीत ऊसबिल न देणाऱ्या साखर कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांना त्यांची थकीत ऊसबिले त्वरीत मिळावीत या मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संघटनेच्यावतीने उद्या गुरुवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.सकाळी 9 ते 11 या वेळेत आंदोलन होणार असल्याची माहिती संघटेनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली.
पंढरपूर ते टेंभुर्णी रोडवर भोसेपाटी, सोलापूर ते पुणे रोडवर सावळेश्वर, कुर्डूवाडी ते बार्शी रोडवर रिधोरे, सोलापूर ते बार्शी रोडवर राळेरास, टेंभुर्णी ते नगर रोडवर जातेगाव, अकलूज ते सांगोला रोडवर मळोली, पंढरपूर ते कराड रोडवर महुद, सोलापूर ते मंगळवेढा रोडवर माचणुर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रूप या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे.