बाप रे ! ऐकावं ते धक्कादायक !!
बदलापूर घटनेची स्मार्ट सिटी सोलापुरात पुनरावृत्ती
चिमुरडीवर शाळेतील नराधम शिपायाकडून अत्याचार
: 55 वर्षाच्या दाढी पिकलेल्या नराधम
म्हातार्याची पोलीस ठाण्यात वरात
: संशयितास आज गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी
: सहा महिन्यांपासून छळवाद सुरु असलेले
छोट्या गटातील लेकरु आईच्या कुशीत बोललं
: चिमुकलीचे पोट दुखू लागल्यानंतर
नराधमाचे ‘काळे’ कृत्य आले समोर
खास प्रतिनिधी
सोलापूर : बदलापूर घटनेची स्मार्ट सिटी सोलापुरात पुनरावृत्ती झाल्याची अत्यंत संतापजनक आणि सोलापूरचे समाजमन हादरवून टाकणारी घटना बुधवारी (ता.26) उघडकीस आली आहे. शिक्षण विश्वाला कंलकित करणार्या या घटनेनं तमाम पालक आणि शाळा चालक यांना चिंतनशिल बनवलं आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या नामांकित शाळेमधील छोट्या गटात शिक्षण घेणार्या चिमरुडीवर याच शाळेतील एका 55 वर्षीय शिपायाने अत्याचार केल्याची अत्यंत ंचिड येणारी घटना पोलीस तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी नराधम संशयित पोलिसांनी ङ्ग्रान्सिस आशिष पिंटो या शिपायाला शाळेतूनच जेरबंद केले. न्यायालयाने त्याला गुरुवार 28 मार्चपर्यंतची पोलिस कोठडी ठोठावली असून गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त यशवंत गवारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, मागच्या सहा महिन्यांपासून या चिमरुडीचा नराधमाकडून छळवाद सुरु होता. त्या चिमुरडीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने संबंधित संशियताने तिच्यासोबत केलेले ‘काळे’ कृत्य आईला सांगितले. तद्नंतर या प्रकरणी पिडीत चिमुरडीच्या आईने सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासामध्ये ही खळबळजक घटना पुढे आली आहे.
साधारण ऑक्टोबर2024 पासून म्हणजे सहा महिन्यांपासून त्या चिमुरडीचा छळ होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शाळेतील 55 वर्षीय शिपाईच छोट्या गटात शिकणार्या चिमुरडीचा छळ करीत होता. पीडितेच्या पोटात दुखू लागल्यावर हा प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपी ङ्ग्रान्सिस पिंटो याची पोलिस कोठडी उद्या (गुरुवारी) संपणार असून तपास अजून बाकी असल्याने आम्ही आरोपीची पोलिस कोठडी वाढवून घेणार असल्याचे तपास अधिकारी गवारी यांनी सांगितले.
चौकट
प्रिन्सिपल महोदयांची लपवाछपवी
शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध शाळेत हा प्रकार घडल्याने शिक्षण विश्व हादरले आहे. हा प्रकार समजल्यावर असे काही झालेच नसावे, अशी भूमिका तेथील प्रिन्सिपलची होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. प्रिन्सिपल दालनात सीसीटीव्ही कॉमेर्यांचे चित्रण 24 तास सुरू असते. तरीही हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. हा प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षकांकडून काढून सहायक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.
चौकट
वासनांध नराधम चिमुरडीच्या असायचा सतत मागावरच…
चिमुकलीने तिच्या आईला सांगितल्याप्रमाणे शाळेतील शिपाई ङ्ग्रान्सिस पिंटो (वय 55) हा त्या चिमुकलीचा ऑक्टोबर 2024 पासून छळ करीत होता. ती बाथरूमला गेल्यावर तो तेथे जाऊन तिच्या वेगवेगळ्या भागाला हात लावायचा, चिमटे काढायचा. दरम्यान, त्या चिमुकलीच्या पोटात खूप दुखू लागल्यावर आईने तिला विश्वासात घेऊन विचारले. त्यावेळी तिने संपूर्ण हकिगत आईला सांगितली आणि हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने शाळेतील सीसीटीव्हीची हार्डडिस्क ताब्यात घेतली असून त्यात 20 दिवसांचेच ङ्गुटेज आहे. सीसीटीव्हीचे बॅकअप 20 दिवसांचेच आहे, पण पीडितेच्या सांगण्यानुसार मागील सहा महिन्यांवर हा प्रकार तिच्यासोबत सुरू होता.
वैद्यकीय चाचणीनंतर अधिक माहिती येईल समोर
संशयित आरोपीने त्या चिमुकलीसोबत नेमका काय प्रकार केला, यासंदर्भात पोलिस कसून तपास करीत आहेत. त्याअनुषंगाने, आता पीडित चिमुकलीची वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले