Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गटनेते पदाच्या वादातून स्थायी आणि परिवहन समितीच निलंबित; भाजप न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

गटनेते पदाच्या वादातून स्थायी आणि परिवहन समितीच निलंबित; भाजप न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

Surajya Digital
Last updated: 2021/03/15 at 6:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतींच्या निवडीत पुन्हा पेच निर्माण झालाय. गटनेते पदाच्या वादातून थेट स्थायी समिती आणि परिवहन समितीच निलंबित केलीय. महापालिका स्थायी व परिवहन समिती सदस्यांच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नियुक्त्या नगरविकास खात्याने सोमवारी बेकायदेशीर ठरविल्या. त्यामुळे पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्थायी व परिवहन समिती सभापती निवड आज सोमवारी स्थगित केली.

एमआयएमचा गटनेता कोण या वादातून मागील आठवड्यात निवडणूक प्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली होती. मात्र कोर्टाच्या आदेशामुळे आज ही प्रक्रिया पार पडणार होती. आज निवडणुक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शासनाने संपूर्ण स्थायी समिती आणि परिवहन समितीच निलंबित केली. त्यामुळे आज होणारी निवडणूक प्रक्रिया देखील रद्द करावी लागली आहे.

स्थायी व परिवहन सदस्य निवडीवरुन एमआयएम सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. समितीच्या सदस्य पूनम बनसोडे यांनी नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे नगरविकास खात्याने 5 मार्च रोजी निवडणुकीला स्थगिती दिली होती. याविरुद्ध भाजपच्या अंबिका पाटील उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तत्काळ निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या दरम्यान नगर विकास खात्याने पूनम बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीसंदर्भात विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागवला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विभागीय आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सदस्य निवडी नियमांना धरून झालेल्या नाहीत, असा अहवाल नगरविकास खात्याला पाठवला. त्यानुसार नगर विकास खात्याने सदस्य निवडीचे दोन्ही ठराव विखंडनास पात्र असल्याचा आदेश काढला. याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाला पाठवले. हे पत्र तत्काळ पीठासन अधिकाऱ्यांकडे पोहोचले. या पत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक स्थगित केली. भाजपाच्या सदस्यांनी पुन्हा जल्लोषाची तयारी केली होती. परंतु नगर विकास खात्याच्या आदेशामुळे पुन्हा त्यांचा हिरमोड झाला.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करत पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला विकासापासून रोखण्याचे काम केले आहे. असा आरोप भाजपचे पक्षनेते श्रीनिवास करली यांनी केला. एमआयएमच्या गटनेते पदाचा वाद असताना संपूर्ण समितीच निंलबित करण्यात आली आहे. हा सत्तेचा गैरवापर असून भाजप या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.

* 2018 पासून सभापतीविना पालिकेचा कारभार

2018 साली सत्ताधारी भाजपच्या विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या गटात चढाओढ पाहायला मिळाली होती. ऐन अर्ज दाखल करण्याच्या वेळी विजयकुमार देशमुख गटातील एका कार्यकर्त्यांने सुभाष देशमुख गटातील सभापती पदाच्या उमेदवाराचा अर्ज पळवून नेला होता. हा सगळा गोंधळ न्यायलयात पोहोचल्याने जवळपास 3 वर्ष स्थायी समितीच्या सभापतीविनाच पालिकेचा कारभार सुरु होता.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #mahanagrpalika #sthai #parivhan #samiti #nilibeet, #सोलापूर #स्थायी #परिवहन #समिती #निलंबित #भाजप #न्यायालयाचा #दरवाजा #ठोठावणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डॅमेज कंट्रोलमुळे गृहमंत्री देशमुखांना हटवण्याच्या हालचाली
Next Article सोलापुरात ऊर्जामंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?