Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रभाग सहाच्या पोटनिवडणुकीसाठी आयुक्तांचे निवडणूक आयोगाला पत्र; तौफिक शेख यांना मुदत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरHot News

प्रभाग सहाच्या पोटनिवडणुकीसाठी आयुक्तांचे निवडणूक आयोगाला पत्र; तौफिक शेख यांना मुदत

Surajya Digital
Last updated: 2020/11/03 at 11:12 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : प्रभाग क्र. सहामधील नगरसेविका वत्सला बरगंडे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांची जागा रिक्‍त झाल्याने त्या जागेसाठी पोटनिवडणूक होणे अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी, असे पत्र महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठविले आहे. मात्र, यावर आयोगाचे काहीच उत्तर मिळालेले नाही.

महापालिकेचे निवडून आलेले 102 नगरसेवक आहेत. त्यापैकी देशमुख-पाटील वस्ती व आमराई परिसरात राहणाऱ्या वत्सला बरगंडे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांची जागा रिक्‍त झाली आहे. आता त्याठिकाणी पोटनिवडणुकीचे वेध लागले आहे.  महापालिकेच्या निवडणूक शाखेने 10 सप्टेंबर 2020 रोजी राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग सहाच्या पोटनिवडणुकीसाठी पत्र दिले आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाईल, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

* तौफिक शेख यांना 30 दिवसांची मुदत

दुसरीकडे एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे नगरसेवकपद सर्वसाधारण सभेला सलग सहा महिने गैरहजर राहिल्याने जिल्हा न्यायालयाने रद्द ठरविले आहे. त्याचवेळी त्यांना उच्च तथा सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर त्यांच्या जागेचा निर्णय होणार आहे.

“प्रभाग सहामधील एक नगरसेविकेचे निधन झाले आहेत. त्यामुळे या रिक्‍त जागेची पोटनिवडणूक घेण्यास परवानगी द्यावी, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. त्यांच्याकडून अद्याप उत्तर प्राप्त झाले नसून मान्यता मिळाल्यानंतर पोटनिवडणूक घेतली जाईल”

–  पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #प्रभागसहा #पोटनिवडणूक #पालिकाआयुक्त #निवडणूकआयोगास #पत्र #तौफिकशेख #मुदत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात विशेष पूजा, होमहवन
Next Article आशा स्वयंसेविकांसाठी गुडन्यूज; दिवाळीअगोदर वाढीव मोबदला मिळणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?