Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त

admin
Last updated: 2025/06/30 at 5:24 PM
admin
Share
2 Min Read
crime
SHARE

सोलापूर, 30 जून (हिं.स.) : करमाळा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करून दोघा मोटरसायकल चोरास बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 7 लाख 20 हजार रुपयांच्या मोटार सायकली जप्त केल्या. निलेश भास्कर कदम (वय 26, रा. घाटणे ता. माढा) व पृथ्वीराज उर्फ गोट्या कांतीलाल काळे (वय 27, रा. नेलें ता. करमाळा) असे बेड्या ठोकलेल्या संशयित आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून 7 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 12 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. दोघांनाही करमाळा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. करमाळा हद्दीत सी.सी.टी.व्ही कॅमेरेचे प्रमाण कमी असल्याचा फायदा घेऊन शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे

. त्यामुळे मोटारसायकल चोर पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. तरीही यश येत नसल्याने मोटारसायकल चोरीचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे करमाळा पोलिसांनी ऑलआऊट कोंबींग ऑपरेशन सुरू केले. या दरम्यान, एक इसम करमाळा येथील हद्दीत मोटरसायकल चोरी करत असल्याची गोपनीय बातमी मिळाली. यावेळी सर्वत्र नाकाबंदी करून तपासणी करण्याची मोहीम सुरू केली. यावेळी करमाळा जामखेड रस्त्यावरील जामखेड बायपास चौकामध्ये सापळा रचत नीलेश कदम याला संशयित म्हणून पकडले.

त्याच्याकडे असलेल्या वाहनाची तपासणी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. नीलेश कदम याने 11 चोरीच्या मोटरसायकली काढून दिल्या. कमलादेवी चौकामध्ये नाकाबंदी करत असताना हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी अति भरधाव वेगाने सालसे कुर्डूवाडी रोडकडे जात असताना एका इसमाचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पृथ्वीराज उर्फ गोट्या काळे यास पकडले. त्याने हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी चोरी केल्याची कबुली दिली.

You Might Also Like

इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचे मुंबईत आपत्कालीन लँडींग; सर्व प्रवासी सुरक्षित

फौजा सिंग यांचा हिट अँड रन प्रकरणात एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक

लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना

देशभरात मान्सूनचा जोर; मप्र-राजस्थानात पूरस्थिती, वीज कोसळून, बुडून पाच जणांचा मृत्यू

राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून उज्ज्वल निकमांसह चौघे राज्यसभेवर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
Next Article पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

Latest News

Massive fire at shopping mall in Iraq; 60 people killed, many missing
इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग; ६० लोकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
देश - विदेश July 17, 2025
IndiGo's Delhi-Goa flight makes emergency landing in Mumbai; all passengers safe
इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचे मुंबईत आपत्कालीन लँडींग; सर्व प्रवासी सुरक्षित
Top News July 17, 2025
हरियाणा : रोहतकमध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
देश - विदेश July 17, 2025
Army jawan arrested for spying for Pakistan
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैन्य जवानाला अटक
देश - विदेश July 17, 2025
Electricity will be free in Bihar; Chief Minister Nitish Kumar's big announcement before elections
बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी घोषणा
देश - विदेश July 17, 2025
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र July 16, 2025
फौजा सिंग यांचा हिट अँड रन प्रकरणात एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक
Top News July 16, 2025
देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?
महाराष्ट्र July 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?