Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर विद्यापीठाचा भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर विद्यापीठाचा भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार

admin
Last updated: 2025/06/15 at 3:31 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 15 जून (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केंद्र सरकारच्या मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आकृती केंद्राशी सामंजस्य करार केला आहे. यामुळे विद्यापीठाशी संलग्न असणार्‍या विद्यार्थ्यांना भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केलेल्या दोनशेहून अधिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर येथील विद्यार्थ्यांना अणुसंशोधन केंद्रामध्ये प्रकल्प करण्याबरोबरच प्रशिक्षणही मिळणार आहे. या करारावर दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत कराराचा कार्यक्रम झाला. यावेळी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वैज्ञानिक अधिकारी तथा आकृती ग्रुपच्या लीडर भारती भालेराव, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. अंजना लावंड उपस्थित होते.

या कराराचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा सांगितले.अन्न, कृषी, पाणी, औषधे, अभियांत्रिकी आदी क्षेत्राशी संलग्न समाज उपयोगी 200 हून अधिक तंत्रज्ञान भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केले आहे. या विकसित तंत्रज्ञानाचा वापर व उपयोग आता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना करता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यासही विद्यार्थ्यांना करता येणार आहे. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट, ट्रेनिंग तसेच व्यवसायासाठी परवानगीही भाभा अणुसंशोधन केंद्राकडून मिळणार आहे.

—————

You Might Also Like

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

खा. प्रणिती शिंदेचा स्वबळाचा नारा

सांगोला तालुक्यातील आरोग्याचे प्रलंबित प्रश्न सोडवा : दीपक साळुंखे

नोटरी करून एकाच जागेची अनेकांना विक्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खा. प्रणिती शिंदेचा स्वबळाचा नारा
Next Article शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे – सुळे

Latest News

इराणची धमकी, ट्रम्प यांचा थेट आणि कठोर इशारा
देश - विदेश June 15, 2025
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती
महाराष्ट्र June 15, 2025
इंद्रायणी घटना : दोघांचा मृत्यू तर ६ जणांना वाचवण्यात यश – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 15, 2025
मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार
सोलापूर June 15, 2025
सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू
सोलापूर June 15, 2025
आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजन
महाराष्ट्र June 15, 2025
शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे – सुळे
महाराष्ट्र June 15, 2025
खा. प्रणिती शिंदेचा स्वबळाचा नारा
सोलापूर June 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?