सोलापूर – महापालिकेच्या आशा वर्कर्सना पैशाचे आमिष दाखवून महापालिकेच्या प्रसूतिगृहात आलेल्या महिलांना खासगी दवाखान्यात पाठविल्याच्या प्रकारानंतर, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी डफरीन चौकातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाला अचानक भेट दिली. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, नॉर्मल प्रसूती होत असताना विनाकारण छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) रुग्ण पाठविल्यास संबंधित डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
अचानक तपासणीदरम्यान प्रसूतिगृहातील प्रसूतीचे प्रमाण घटल्याचे आढळले. त्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात वळविणे किंवा अनावश्यकरीत्या सिव्हिल हॉस्पिटलला पाठविणे टाळावे, असा इशारा देण्यात आला. नियम मोडल्यास सेवासमाप्तीची कारवाईही होऊ शकते, असे डॉ. माने यांनी सांगितले.