Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात जि.प. शाळेने केली अनोख्या पद्धतीने होळी साजरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात जि.प. शाळेने केली अनोख्या पद्धतीने होळी साजरी

Surajya Digital
Last updated: 2022/03/17 at 8:30 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

श्रीपूर : आज सर्वत्र होळी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्यात माळशिरस तालुक्यातील श्रीपूरमध्ये अनोख्या पद्धतीने होळी साजरी झाली. त्याची जिल्हाभर चर्चा होत आहे.

वृक्षतोड न करता जि. प. प्राथमिक मुंडफणेवाडी या शाळेने अनोखी होळी साजरी केली. निसर्गातील झाडांची वृक्षतोड न करता शाळा व शाळेच्या परिसरातील केर कचरा गोळा करून होळी साजरी करण्यात आली. होळी मध्ये स्री-भ्रूणहत्या, प्लॅस्टिक बंदी, कोरोना विषाणू, दारू, सिगारेट, तंबाखूचे दहन करत जि.प. शाळेने अनोखी होळी साजरी केली आहे.

अनोख्या होळीसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

होळी हा हिंदू संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा हा सण दरवर्षी संपूर्ण भारत देशांमध्ये मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. होळीचा सण मुख्यतः दोन दिवसाचा असतो. परंतु गावा गावानुसार ही प्रथा बदलली जाते. पहिल्या दिवशीच्या रात्री होळी जाळली जाते. तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रंगपंचमी खेळुन एक दुसऱ्याला रंग लावले जातात या दिवशी सर्व लोक आपले राग, द्वेष आणि दुःख विसरून एकमेकांसोबत आनंदाने साजरी करतात म्हणून होळीला अधिक महत्त्व आहे. In Solapur, Z.P. The school celebrated Holi in a unique way

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

दारू, सिगरेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनामुळे युवा पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. समाजातील भरकटत चाललेल्या तरुणीस विधायक वळण देण्यासाठी होळीतून व्यसनमुक्तीचा संदेश द्यावा ही कल्पना उपक्रमशील शिक्षक समीर लोणकर यांनी सुचली. याबरोबर वृक्षतोड न करता त्या ऐवजी गावातील केरकचरा त्यांनी गोळा करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला मुलांना अंधश्रद्धा, मावा, गुटखा, दारू इत्यादी पासून दूर राहण्यापासून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक समीर लोणकर सहशिक्षका अर्चना वाघ आणि शाळा व्यवस्थापनाचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते

 

“कोणताही सण हा आनंद घेऊन येत असतो वाईट विचाराचे नकारात्मक व दुष्ट प्रवृत्तीचे दहन होळीच्या माध्यमातून केले जाते. होळी म्हणजे आपल्यामधील वाईट गुणांना पेटत्या निखाऱ्यात टाकून तिलांजली देणे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून समाजात व्यसनाधीनचे वाढणारे प्रमाण व काळाची गरज ओळखून अनोखी होळी साजरी केली”

□ समीर लोणकर

मुख्याध्यापक, जि. प प्राथमिक शाळा, मुंडफणेवाडी

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #ZP #school #celebrated #Holi #unique #way, #सोलापूर #जिपशाळा #अनोख्यापद्धती #होळी #साजरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर  : बायकोबरोबर भांडण झाल्याने पतीने थेट घराला लावली आग
Next Article ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?