Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: समजूत काढण्यासाठी आलेल्या सासरच्या मंडळीवर जवानाचा गोळीबार, एक ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

समजूत काढण्यासाठी आलेल्या सासरच्या मंडळीवर जवानाचा गोळीबार, एक ठार

Surajya Digital
Last updated: 2021/10/21 at 5:49 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : बार्शी तालुक्यातील भातंबरे गावात गोळीबारची घटना घडलीय. एका एसआरपीएफ जवानाने आपल्या सासुरवाडीच्या लोकांवर गोळीबार केला आहे. गोरोबा महात्मे असे त्या जवानाचे नाव आहे. वैराग पोलिसांनी त्यास अटक केलीय.ही घटना बुधवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान घडली. वैराग पोलिस ठाण्यात पोलिसाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

काशीनाथ काळे (रा. सापनाईता, कळंब) यांनी फिर्याद दाखल केली. नितीन बाबूराव भोसकर (रा. सापनाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका तरुण जखमी झालाय. गोळीबारात नितीन भोसकर व बालाजी महात्मे यांना गोळी लागून जखमी होऊन खाली पडले तर काशीनाथ काळे व जालिंदर काळे पळून जात असताना गोळीबार केला असता गोळीपासून सुदैवाने बचावले. गोळीबाराची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून या जवानाने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. काल रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली आहे. पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.

नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो आरोपी जवानाच्या मेहुण्याचा मित्र होता. तर गोरोबा महात्मे असं अटक केलेल्या आरोपी जवानाचं नाव आहे.

तो बार्शी तालुक्यातील भातंबरे येथील रहिवासी असून सध्या मुंबईत कार्यरत आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

   * मृत नितीन बाबूराव भोसकर

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आरोपी जवान गोरोबा महात्मे याचा हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होता. पत्नीचा बाहेर कोणासोबत तरी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय जवानाला होता. यातून त्याचे पत्नीसोबत वाद झाले होते. त्यामुळे जवानाची समजूत काढण्यासाठी सासरची मंडळी जवानाच्या घरी आले होते. यावेळी आरोपी जवानाच्या मेहुण्याचा एक मित्र देखील सोबत आला होता.

यावेळी सासुरवाडीच्या मंडळीसोबत बोलणी फिसकटल्याने जवानाने रागाच्या भरात जमलेल्या लोकांवर गोळीबार केला. आरोपी एसआरपीएफ जवानाने चार गोळ्या झाडल्या.

आरोपी जवानाच्या मेहुण्याचा मित्र नितीन बाबुराव भोसकर याला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गोळीबारात जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी जवानाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.

* आष्टीत दोन गटात हाणामारी, ५ जखमी २० जणांवर गुन्हा

सोलापूर – आष्टी (ता. मोहोळ) येथे वाढदिवसाचे कार्यक्रम बंद करण्यासाठी पोलिस ठाण्याला कळविल्याच्या कारणावरून सोंडगे आणि खरात यांच्या गटात काठी,ऊस आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत ५जण जखमी झाले ही. घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात मोहोळच्या पोलीसांनी परस्परविरोधी फिर्याद नोंदवून दोन्ही गटातील २० जणांवर गुन्हा दाखल केला.
सोनुबाई सिद्धेश्वर खरात (वय ३१) हिने दिलेल्या फिर्यादीवरून वसंत दत्तू सोंडगे, परमेश्वर संदिपान सोंडगे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या सर्वांनी मिळून काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने ती स्वतः आणि त्यांचे सासरे जखमी झाले असे तिच्या फिर्यादीत नमूद आहे. तर अभिजित बाळू सोंडगे (वय २२) याने दिलेल्या विरुद्ध फिर्यादीवरून सोजरबाई दादाराव खरात, भामाबाई कल्याण खरात यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या सर्वांनी मिळून उस आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने  स्वतः आणि त्याचे दोन भाऊ जखमी झाले. असे त्याच्या फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #soldier #shot #dead #father-in-law's #congregation, #समजूत #सासर #मंडळी #जवान #गोळीबार #एकठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article समुद्रात सापडली 900 वर्षे जुनी तलवार, केली सरकार जमा
Next Article ‘एकमेकांच्या काड्या करणे आणि जिरवणे ही काँग्रेसची परंपरा’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?