Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुणालयात केले दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुणालयात केले दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 12:35 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरुवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नियमित वैद्यकीय चाचण्या आणि तपासणीसाठी सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायंकाळी सात वाजता त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितले.  याआधीही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ही नियमित वैद्यकीय तपासणी असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांच्या नियमित तपासण्या करण्यासाठी दाखल करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे.  काँग्रेसच्या गोटातून अद्यापही या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.

राहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल अध्यक्षपदावरून पायऊतार होते. त्यानंतर महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होतं.

राहुल गांधी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या हाती काँग्रेसची सूत्र आली आहेत.  कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात आघाडी उघडली होती.  अलीकडच्या काळात महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्हीडिओ जारी करून त्या त्यांची मतं मांडताना दिसत आहेत.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #सोनियागांधी #काँग्रेसअध्यक्षा #रुग्णालयात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत दोन मृत्यू तर नवीन 241 पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 2307 तर 1033 जण कोरोनामुक्त
Next Article कर्तव्यावर हजर न होणाऱ्या सांगलीतल्या सेवा सदन लाईफलाईन रुग्णालयातील आठ जणांवर गुन्हा

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?