Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठेपणा करण्याचा ‘नाद’ आला भाजपच्या ‘अंगलट’, झाली नाचक्की
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मोठेपणा करण्याचा ‘नाद’ आला भाजपच्या ‘अंगलट’, झाली नाचक्की

Surajya Digital
Last updated: 2021/03/22 at 11:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना एका घटनेमुळे भाजप पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. भाजपचे ‘जुमले’ आणि त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी या दोन मुद्द्यांवरुन विरोधक कायम मोदी सरकारला लक्ष्य करतात. आतादेखील असाच मोठेपणा करण्याचा नाद भाजपच्या अंगलट आला आहे.

भाजपकडून काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये पंतप्रधान निवास योजनेच्या यशाचा दिंडोरा पिटणाऱ्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. ‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर बंगाल’ अशा मथळ्यासह या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. यामध्ये एका लाभार्थी महिलेचे छायाचित्र आणि 24 लाख कुटुंबाना घरकुल मिळाल्याचा दावा करण्यात आला होता.

ही जाहिरात पाहून प्रसारमाध्यमांनी या महिलेचा शोध घेतला. तिचे नाव लक्ष्मी देवी असे आहे. ही जाहिरात छापून आल्यानंतर त्यामध्ये आपले छायाचित्र आहे, हे लक्ष्मी देवी यांना समजले. या महिलेची अधिक चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला. लक्ष्मी देवी यांना पंतप्रधान निवास योजनेतंर्गत कोणतेही घर मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले.

* लक्ष्मी देवींचे खरे सत्य

मोदी सरकारकडून लक्ष्मी देवी या पंतप्रधान निवास योजनेच्या लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, लक्ष्मी देवी या प्रत्यक्षात भाड्याच्या लहानशा झोपडीवजा घरात राहतात. त्यासाठी लक्ष्मी देवी महिन्याला 500 रुपये भाडे देतात. ही सगळी सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लक्ष्मी देवी या मूळच्या बिहारमधील छपरा येथील रहिवासी आहेत. त्या लहान असताना त्यांचे कुटुंब कोलकात्याला स्थलांतरित झाले होते. गेल्या 40 वर्षांपासून लक्ष्मी देवी कोलकाता येथील मलागा लाइन परिसरात राहतात.

पतीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मी देवी यांच्यावर येऊन पडली. त्यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत. या सर्वांची लग्न झाली आहेत. दोन मुलं माझ्यासोबत राहतात. ते कुरिअर पोहोचवण्याचं काम करतात. यामधून त्यांना दिवसाला 200 ते 300 रुपये मिळतात, असे लक्ष्मी देवी यांनी सांगितले.

लक्ष्मी देवी यांनी वृत्तपत्रांमध्ये आपले छायाचित्र बघितल्यापासून त्या प्रचंड वैतागल्या आहेत. हा फोटो मुळात घेतला कधी गेला याची माहितीही लक्ष्मी देवी यांना नाही. त्यांनी सगळ्या या स्थानिक वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन माझे छायाचित्र का छापले, अशी विचारणा केली. तेव्हा हा फोटो वृत्तपत्रांनी छापला नसून केंद्र सरकारने जाहिरात दिल्याचे त्यांना समजले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #sound #magnanimity #BJP's #fingertips, #मोठेपणा #करण्याचा #नाद #भाजपच्या #अंगलट #नाचक्की
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच करणार दुसरे लग्न!
Next Article एनआयओएसद्वारे घेण्यात आलेल्या 10 वी, 12 वी चा निकाल जाहीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?