Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ढोल – ताशांच्या निनादात सोलापूर उत्तरमधून सावरकर गौरव यात्रा, भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांचाही सहभाग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

ढोल – ताशांच्या निनादात सोलापूर उत्तरमधून सावरकर गौरव यात्रा, भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांचाही सहभाग

Surajya Digital
Last updated: 2023/04/06 at 3:59 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● प्रा. अशोक निंबर्गी – सुरेश पाटील पाच वर्षांनी एकत्र; आता मतभेद, कटुता नसल्याचे दोघांचे स्पष्टीकरण

 

सोलापूर : थोर समाजसुधारक, तेजस्वी विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ, ढोल – ताशे आणि हलगीच्या कडकडाटात सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून बुधवारी आ. विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शिवसेनेच्या नेत्यांनीही सहभाग नोंदवला. Savarkar Gaurav Yatra from Solapur North to the sound of drums and drums, BJP and Shiv Sena leaders also participated.

मल्लिकार्जुन मंदिरापासून या यात्रेची सुरुवात झाली. या गौरव यात्रे त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्ररथ करण्यात आला होता. त्यांचे तैल चित्र त्याचबरोबर आकर्षक सजवलेल्या बगीमध्ये वीर सावरकरांची प्रतिमा ठेवून या यात्रेस सुरुवात झाली. मल्लिकार्जुन मंदिर, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौक मार्गे ही यात्रा निघाली. या यात्रेचा समारोप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालया जवळ करण्यात आला.

 

या यात्रेमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. भगवे शेले, भगवे झेंडे मी सावरकर लिहिलेल्या टोप्या घालून शेकडो आबालवृध्दांनी या यात्रेत सहभाग नोंदवला. काँग्रेसकडून राजकारणासाठी त्यांचा वारंवार अपमान केले जाणे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे असं आ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

 

यात्रेत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज शेजवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले, नाना मस्के, मनीष काळजे, राम तडवळकर, संजय कोळी, राजकुमार पाटील, संजय कणके, शिवानंद पाटील, डॉक्टर किरण देशमुख, भैया बनसोडे, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश साखरे, महिला आघाडी अध्यक्ष इंदिरा कुडक्याल, नारायण बनसोडे, अनंत जाधव, प्रशांत फत्तेपूरकर, अमर पुदाले, ज्ञानेश्वर कारभारी, देविदास चेळेकर, प्रसाद कुलकर्णी, शंकर शिंदे, राजाभाऊ आलुरे, अमोल झाडगे शिवा कामाठी, राजकुमार माने बाबुराव संगेपागख रोहिणी तडवळकर, अंबिका पाटील, कल्पना कारभारी, रेखा गायकवाड, सुनिता कोरे, विमल पुट्ठा, विजया वड्डेपल्ली, सोनाली मुटकेरी, रुचिरा मासम, वैशाली गुंड, राधिका पोसा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● प्रा. अशोक निंबर्गी – सुरेश पाटील पाच वर्षांनी एकत्र; आता मतभेद, कटुता नसल्याचे दोघांचे स्पष्टीकरण

 

सोलापूर : भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील हे तब्बल ५ वर्षांनी एकत्र एका व्यासपिठावर पाहावयास मिळाले निमित्त होते बसवंती स्मृती पुरस्कार पत्रकार परिषदेचे. या पत्रकार परिषदेत प्रा. निंबर्गी आणि सुरेश पाटील या दोघांनीही आता आमच्यामध्ये आता कोणतीही कटूता राहिली नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

 

बसवंती पुरस्काराचे आयोजन १० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे या निमित्त मंगळवारी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला प्रा. अशोक निंबर्गी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, मयूर बसवंती आदी उपस्थित होते.

 

 

काही वर्षांपूर्वी सुरेश पाटील यांनी आपल्यावर विष प्रयोग झाला असून त्यामध्ये प्रा.निंबर्गी यांच्यासह पाचजणांचा समावेश असल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपमध्ये बराच गदारोळ झाला होता. ही घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेपासून सुरेश पाटील आणि निंबर्गी यांच्यात दुरावा आला होता. मात्र बसवंती स्मृती पुरस्काराच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने हा दुरावा मिटल्याचे दिसून आले.

 

यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, आपल्यात आणि अशोक निंबर्गी यांच्यात आता कोणतीही कटुता राहिली नाही. झाले गेले गंगेला मिळाले. आपल्यावर विष प्रयोग झाला आणि तो करण्यामागे प्रा. निंबर्गी यांच्यासह आपण काही जणांची नावे घेतली.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Savarkar #GauravYatra #SolapurNorth #sound #drumsanddrums #BJP #ShivSena #leaders #participated., #ढोल #ताशा 'निनाद #उत्तरमधून #सावरकर #गौरवयात्रा #भाजप #शिवसेना #नेते #सहभाग, #पंढरपूर #सोलापूर #गणेशोत्सव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सीमावर्ती गावांतील योजना थांबवा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा शिंदे सरकारला इशारा
Next Article राहुल गांधींमुळे काँग्रेस सोडली, गुलामनबी आझाद यांनी केले खुलेआम आरोप

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?