Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जीममध्ये कसरत करताना सौरव गांगुलींची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

जीममध्ये कसरत करताना सौरव गांगुलींची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/01/02 at 2:42 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. गांगुलीनं नुकताच त्याच्या मुलीसोबत जाहीरात केल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या जाहीरातीची चर्चा असताना या बातमीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.

सौरव गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. ‘आरे’ ला ‘कारे’नं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांना भिडण्याची ताकद दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

२००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत गांगुलीनं जर्सी काढून केलेलं सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे.

बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीनं अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. गांगुलीनं ११३ कसोटीत ४२.१७ च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी चोपल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.

You Might Also Like

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

TAGGED: #जीममध्ये #कसरत #करताना #सौरवगांगुलींची #तब्येत #बिघडली #तातडीने #रुग्णालयात #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “एकतर तुम्ही मला चहाला बोलवा, किंवा तुम्ही माझ्याकडे या”
Next Article कोरोना लस मोफत मिळणार नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोफत लसीच्या घोषणेवरुन घुमजाव

Latest News

एसटी महामंडळाच्या २ हजार बसेसचा एमएसटीसीच्या माध्यमातून होणार लिलाव
Top News June 26, 2025
crime
मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले
देश - विदेश June 26, 2025
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार
देश - विदेश June 26, 2025
उत्तराखंड : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता, बचावकार्य सुरु
देश - विदेश June 26, 2025
मेक्सिको : धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबार,१२ जणांचा मृत्यू तर २० जखमी
देश - विदेश June 26, 2025
अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार
महाराष्ट्र June 26, 2025
दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील – राजनाथ सिंह
देश - विदेश June 26, 2025
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?