Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Nandani toll plaza नांदणी टोलनाक्यावर एसआरपीएफ पोलिसासह सहाजणांनी मिळून केली तलवारीने मारहाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

Nandani toll plaza नांदणी टोलनाक्यावर एसआरपीएफ पोलिसासह सहाजणांनी मिळून केली तलवारीने मारहाण

Surajya Digital
Last updated: 2022/06/05 at 9:50 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर – विजयपूर महामार्गावरील नांदणी टोलनाक्यावर टोल मागितल्याच्या कारणावरून एसआरपीएफ पोलिसाच्या गाडीतील सहा जणांनी मिळून टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून तोडफोड केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल झाला. यात चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात कायद्याचे  रक्षक  असलेल्यानीच कायदा पायदळी तुडवला आहे. Six persons, including SRPF police, stabbed at Nandani toll plaza

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट… ● सोलापुरात सोमवारी शांता शेळके यांच्या गीतांचा कार्यक्रम

 

एसआरपीएफ पोलीसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यात वापरलेली गाडी ही एस आर पोलिसाची आहे. ती गाडी व आतील तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नागेश भीमाशंकर स्वामी (वय वर्षे 28), राहणार टोलनाका, नांदणी, ता. दक्षिण सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत फिर्यादी भीमाशंकर स्वामी, आनंद राठोड, महांतेश सोनकंटले जखमी झाले आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

रोहन सुरेश जाधव (वय वर्षे ३०), गजानन आणाराव कोळी (वय वर्षे २९), दोघे राहणार सैफुल, सुरज बबनराव शिकारे (वय वर्षे ३१), एसआरपीएफ पोलीस शिपाई शिवशंकर बबनराव शिकारे (वय वर्षे २५) राहणार उद्धव नगर, सैफुल ! सोलापूर व इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी हे सर्व जेवण करायला टाकळी येथे ( इनोव्हा त्याचा क्रमांक एम एच ०२ एक क्यू ४४५५) मधून गेले होते. जेवण करून येत असताना शनीवार, दि. 4 जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास, नांदणी येथील टोल नाक्यावर टोलचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला. दरम्यान गाडीतील चौघांनी तलवारी हातात घेऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच टोलनाक्याच्या कार्यालयाचे तोडफोड करून नुकसान केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित करपे हे करत आहेत.

 

 

 ● सोलापुरात सोमवारी शांता शेळके यांच्या गीतांचा कार्यक्रम

 

#poetry #poetess #सुराज्यडिजिटल #surajyadigital
#shantashelke #solapur #सोलापूर

 

सोलापूर : हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संगीत विभागातर्फे ख्यातनाम कवयित्री गीतकार शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरात त्यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम सोमवारी (६ जून) सायंकाळी ६.१५ वा. वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले आहे.

 

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Six #persons #SRPF #police #stabbed #Nandani #toll #plaza #solapur, #टोलनाका #एसआरपीएफ #पोलिस #सहाजण #तलवारी #मारहाण #अटक #नांदणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट : कर्जाळ पुलावरील अपघातात महिला ठार; संतप्त ग्रामस्थांनी रोखून धरला रस्ता
Next Article हॉटेल व्यावसायिकाच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करून लुटले

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?