सोलापूर : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. याचा प्रभाव सर्वत्र दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर तर याचा प्रभाव खूपच वाढला आहे. दुसऱ्यांचे जीव वाचविण्यासाठी, दुसऱ्यांच्या मदतीसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळातील महिला वाहकाचा कोरोनामुळे काल शुक्रवारी मृत्यू झाला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388088012542779394?s=20
सुनंदा अशोक कुंभार (वय ४५, रा. नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) असे महिला वाहकाचे नाव आहे. सुनंदा कुंभार या नोव्हेंबर २००० पासून एसटी सेवेत रुजू झाल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेव्हापासून त्यांनी उस्मानाबाद, तुळजापूर, बार्शी आणि सोलापूर या ठिकाणी वाहक म्हणून सेवा बजावली. दरम्यान, २१ एप्रिल रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388084334729510914?s=20
तब्येत जास्तच बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी चार दिवसांपूर्वी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान काल शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि ननंद आहेत. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला होता. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची माहिती कर्मचाऱ्यांना कळताच कर्मचाऱ्या मधून हळहळ व्यक्त करण्यात येत होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388041202449088516?s=20