Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऊस तोडणी मजूर दाम्पत्य एका रीलनं रातोरात स्टार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

ऊस तोडणी मजूर दाम्पत्य एका रीलनं रातोरात स्टार

Surajya Digital
Last updated: 2023/01/28 at 8:16 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ मेहनतीच्या कामातून विरंगुळा म्हणून इन्स्टाग्रामवर ‘रील’ बनविण्याचा छंदस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ मेहनतीच्या कामातून विरंगुळा म्हणून इन्स्टाग्रामवर ‘रील’ बनविण्याचा छंद

 

सोलापूर : ऊसतोड कामगार म्हटलं की समोर दिसतो तो उसाचा फड आणि उसाचा कारखाना. ऊस तोडणीला जाणाऱ्या कामगारांचे काम पाहिलं तर भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ऊसतोड कामगारांच्या अनेक समस्या पाहायला मिळाल्या आहेत.  sugarcane cutting labor couple overnight star beed hazare family instagram sugar factory with one reel या ऊसतोड कामगारांना ऊस तोडणी मधून वेळच मिळत नाही. मात्र या सगळ्याला अपवाद ठरलंय बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सोनाखोटा गावातील हजारे कुटुंब. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ऊस तोडणीला जाणारं हजारे कुटुंब अचानक महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालंय. त्यामागचं कारणही तसंच आहे.

 

अशोक हजारे त्यांच्या पत्नी मनिषा हजारे यांनी ‘सुराज्य डिजिटल’ शी बोलताना सांगितले, की ऊसतोडणीसाठी घरापासून सहा महिने दूर असतो. समोर फक्त ऊस ,बैल आणि कष्ट हेच दिसते परंतु आमचे दु:ख, काबाडकष्ट हे कुणालाही दिसत नाही. हे जगाला समजावे आणि त्यातून आमच्या साठी कुणीतरी पुढे येत आधार द्यावा तसेच दररोजच्या मेहनतीच्या कामातून विरंगुळा म्हणून आम्ही कष्ट करीत असतानाचा रिल तयार करून तो इन्स्टाग्रामवर टाकला त्यानंतर हजारो लाईक आणि कमेंट्स आल्या त्यानंतर रिल बनविण्याचा जणू छंदच लागला.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

दैनंदिन आयुष्याशी संबंधित व्हिडीओ इन्स्टावर अपलोड करू लागले. मात्र यामध्ये सरस ठरला तो दोघे ऊस घेऊन कारखान्यावर बैलगाडीतून जात असलेल्या व्हिडीओ. त्यामुळे हे कष्टकरी हजारे दाम्पत्य रातोरात स्टार झालं. सोशल मीडियावर या व्हिडीओनं हवा केली.  सध्या ते ऊस तोडणीसाठी सांगली जिल्ह्यात असलेल्या शिवशक्ती साखर कारखान्यात ऊस तोडणीचं काम करतात. ऊस तोडणीसारख्या मेहनतीच्या कामातून विरंगुळा म्हणून त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली.

आपल्या दैनंदिन आयुष्यातील क्षण त्यांनी इन्स्टावर शेअर केले. बैलगाडीतून ऊस घेऊन जाणाऱ्या हजारे दाम्पत्याचा व्हिडीओ इन्स्टावर गाजला. तो तुफान व्हायरल झाला. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंद शोधता आला पाहिजे. ज्याला ही कला जमली, त्याला आयुष्यातला आनंद समजला. त्याला आयुष्य समजलं, अशा आशयासह अनेकांनी हजारे दाम्पत्याचा व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला. आयुष्य जगण्याची कला अगवत झालेलं दाम्पत्य अशा शब्दांत अनेकांनी दोघांचं कौतुक केलं. आयुष्य कितीही परीक्षा घेत असो, काळ कितीही संकटाचा असो परिस्थितीचा आनंद घ्यायला शिका, असा संदेश अनेकांना हजारे दाम्पत्याच्या व्हिडीओतून मिळाला.

ऊस तोडणी करणारे हजारे सहा – सहा महिने घरापासून दूर असतात. ज्या ठिकाणी आपलं कोणीही नाही, त्या ठिकाणी ऊस तोडणीस राहतात. हातातोंडाची गाठ पडावी यासाठी त्यांचा संघर्ष सुरू असतो. मात्र परिस्थिती कितीही कसोटी पाहत असली तरी हजारे दाम्पत्य हसणं विसरलेलं नाही. संकटाच्या, संघर्षाच्या काळात आनंदी, समाधानी राहण्याची कला त्यांना जमली आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #sugarcane #cutting #labor #couple #overnight #star #beed #hazare #family #instagram #sugarfactory #onereel, #ऊसतोडणी #मजूर #दाम्पत्य #एका #रीलनं #रातोरात #स्टार #बीड #हजारे #विरंगुळा #इन्स्टाग्राम #रील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार संतोष बांगरांसह 30 – 40 जणांवर गुन्हा दाखल
Next Article antelope सोलापुरात 14 काळविटांचा दुर्दैवी मृत्यू; पूर्वीही झाला होता अपघात

Latest News

crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद
महाराष्ट्र June 24, 2025
पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं
महाराष्ट्र June 24, 2025
इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपल्याचा ट्रम्प यांचा दावा
देश - विदेश June 24, 2025
इराण- इस्रायलमधील वाढत्या तणावानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू
देश - विदेश June 24, 2025
युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
देश - विदेश June 24, 2025
शुभांशू शुक्ला उद्या घेणार अंतराळात भरारी
देश - विदेश June 24, 2025
लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली
महाराष्ट्र June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?