Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘यास चक्रीवादळ’ घोंघावू लागलं, उद्या सकाळी किनारपट्टीवर धडकणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

‘यास चक्रीवादळ’ घोंघावू लागलं, उद्या सकाळी किनारपट्टीवर धडकणार

Surajya Digital
Last updated: 2021/05/25 at 11:12 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

कोलकाता : पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ‘यास’ चक्रीवादळ निर्माण झालं असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. येत्या २४ तासात यास हे ओडिशा-बंगालच्या किनारी धडकणार असून त्यामुळे या भागात मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आम्ही फक्त केंद्रालाच कोरोना लस देणार – फायझर; फायझर-मॉडर्नाकडून दिल्लीला लस देण्यास नकारhttps://t.co/SwHk1VuFVe

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021


देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर अवघ्या काही दिवसांपूर्वीच अरबी समुद्रात गेल्या २ दशकांत आलेलं सर्वात मोठं चक्रीवादळ तौते धडकलं. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. या चक्रीवादळाचा तडाखा आसाममधील चार जिल्ह्यांना आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील काही भागांना बसण्याची शक्यता आहे.

कोरोना लस न घेतल्यास कर्मचाऱ्यांना मिळणार नाही पगार https://t.co/UqYigbQxwR

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यास चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून १५५-१६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी ओडिशाच्या पराद्वीप आणि बंगालच्या दीघा बेटाच्या दरम्यान असलेलं हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकत आहे आणि आज मंगळवारी या दोन राज्यांच्या किनारी धडकणार आहे. किनारी प्रदेशाकडे येताना ते अधिक भीषण होणार असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

(i) Rainfall Warning: Heavy to very heavy rainfall at isolated places over Andaman & Nicobar Islands on 23rd & 24th; over northcoastal Odisha on 25th; Gangetic West Bengal on 25th-27th and Jharkhand on 26th and Bihar on 27th;

— India Meteorological Department (@Indiametdept) May 23, 2021

दोन दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागानं बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला, तरच यास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. पण आता हे चक्रीवादळ येणार असल्याचं निश्चित झालं आहे. केंद्र सरकारसोबतच पश्चिम बंगाल आणि आसाम राज्य सरकारांनीही या वादळाचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासोबतच एनडीआरएफ, कोस्ट गार्डसोबतच इतर सर्व बचाव यंत्रणा तैनात केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ येऊन गेलं आहे. त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या वादळापेक्षाही यास ची तीव्रता जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल आणि ओडिशामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे.

देशात म्युकरमायकोसिसचे 5, 424 रुग्ण, महाराष्ट्रात 130 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार https://t.co/X1MNzvzBpe

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही परिस्थिती पुढच्या २४ तासांमध्ये चक्रीवादळात रुपांतरीत होण्यासाठी अनुकूल अशी झाली आहे. हे वारे उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकल्यानंतर २४ मे पर्यंत म्हणजेच पुढच्या २४ तासांमध्ये त्यांचं चक्रीवादळात रुपांतर होईल. आणि त्यापुढच्या २४ तासांत म्हणजे २५ मेपर्यंत त्याचं रुपांतर अतीतीव्र चक्रीवादळात होईल. पुढे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने जाताना वादळाची तीव्रता वाढत जाईल.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन https://t.co/JJSd0q749t

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021

उद्या बुधवारी (ता .२६ मे) सकाळी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचेल. या चक्रीवादळाचा वेग इतका असेल की ते संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि बांगलादेशचा किनारपट्टीचा भाग ओलांडून गेले असेल. किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल.

It is very likely to move north-northwestwards, intensify into a Cyclonic Storm by 24th May and further into a Very Severe Cyclonic Storm during subsequent 24 hours. It would continue to move north-northwestwards, intensify further

— India Meteorological Department (@Indiametdept) May 23, 2021

भारतीय हवामान विभागानं यासंदर्भात ट्विटरवरून सविस्तर माहिती दिली आहे. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटांच्या वर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. जसजशी वेळ जात आहे, तसतसा हा पट्टा अधिकाधिक तीव्र होत आहे. चक्रीवादळासाठी आवश्यक असणाऱ्या वर्तुळाकार वाहणाऱ्या वाऱ्यांची परिस्थिती बंगालच्या उपसागरात पूर्वमध्य समुद्रात निर्माण झाली आहे. पुढच्या काही तासांमध्ये ती कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये केंद्रीत होईल.

 

भोला 'पडोसन'!, सुनिल दत्त यांचा स्मृतीदिन (ब्लॉग)https://t.co/U7OfTD8G7u

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021

You Might Also Like

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे

शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

जम्मू-काश्मीर: कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

TAGGED: #started #make #hurricane #coast #tomorrow #morning, #यासचक्रीवादळ #घोंघावू #उद्या #किनारपट्टीवर #धडकणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देशात म्युकरमायकोसिसचे 5, 424 रुग्ण, महाराष्ट्रात 130 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
Next Article शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचे सदस्य पद रद्द

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?