अमरावती, 5 जुलै (हिं.स.)महाराष्ट्रातील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी शासनाच्या उदासीन धोरणांविरोधात आघाडी घेतली असून, येत्या ८ व ९ जुलै रोजी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हजारो शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत शाळा सुरू ठेवण्याचे बंधन असतानाही शिक्षक संघटनांनी हा निर्णय घेतला आहे, हे या आंदोलनाचे गांभीर्य दर्शवते. वेतनातील तफावत, भरती प्रक्रिया ठप्प होणे, पदोन्नतीमध्ये अन्याय आणि नवीन अध्यादेशाची अंमलबाजवणी न होणे याप्रमुख मागण्यांवर सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षक संतप्त झाले आहेत.
राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. शासनाने २०१२ नंतर शिक्षक भरती थांबवली असून, अनेक शिक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. वेतन विसंगती, वेळेवर वेतन न मिळणे आणि सेवा अर्टीच्या अंमलबजावणीत सातत्याने चालढकल केली जात आहे. याविरोधात राज्यभरातील शिक्षक संघटनांनी एकत्र येत ८ आणि ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचे आवाहन केले आहे. मुंबईतील आझाद मैदान, जिथे १०,००० पेक्षा जास्त शिक्षक धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.