Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्य सहकारी संघ निवडणूक : आ. प्रविण दरेकर, गुलाबराव मगर व प्रकाश दरेकर बिनविरोध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

राज्य सहकारी संघ निवडणूक : आ. प्रविण दरेकर, गुलाबराव मगर व प्रकाश दरेकर बिनविरोध

admin
Last updated: 2025/07/07 at 4:07 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

दरेकर-कुसाळकरांच्या नेतृत्वाखाली ’सहकार पॅनेल’ची विजयी घोडदौड

मुंबई, 7 जुलै (हिं.स.) – महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजय कुसाळकर व ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने आपले उमेदवार घोषित केले आहेत.

राज्यस्तरीय व विभागनिहाय उमेदवार

१. प्रकाश यशवंत दरेकर – राज्यस्तरीय संघ प्रतिनिधी, २. हिरामण सातकर – पुणे विभाग, ३. धनंजय सर्जेराव कदम (शेडगे) – कोल्हापूर विभाग, ४. प्रवीण दरेकर – मुंबई विभाग, ५. अरुण पानसरे – कोकण विभाग, ६. गुलाबराव मगर – औरंगाबाद विभाग, ७. वसंत पाटील – लातूर विभाग, ८. प्रकाश भिशीकर – नागपूर विभाग, ९. अशोक जगताप – विभागीय सहकारी संघ प्रतिनिधी, १०. रिक्त – नाशिक विभाग, ११. रिक्त – अमरावती विभाग

इतर संस्था प्रतिनिधी –

१२. संजीव कुसाळकर, १३. रामदास मोरे, १४. नितीन बनकर, १५. सुनील जाधव पाटील, १६. नंदकुमार काटकर, १७. विष्णू घुमरे – अनुसूचित जाती/जमाती, १८. अनिल गजरे – भटक्या/विमुक्त जमाती, १९. अर्जुनराव बोरुडे – इतर मागासवर्ग, २०. जयश्री पांचाळ – महिला प्रतिनिधी, २१. दीपश्री नलावडे – महिला प्रतिनिधी

निवडणुकीपूर्वी ‘सहकार पॅनेल’चे प्रविण दरेकर, गुलाबराव मगर आणि प्रकाश दरेकर हे ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्य सहकारी संघ अडचणीत असून संघास उर्जितावस्था आणण्यासाठी ‘सहकार पॅनेल’ निवडणुकीत उतरले आहे. गत निवडणुकीत कुसाळकर-दरेकर एकमेकांविरोधात पॅनेल उभे करून लढले होते. परंतु या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुसाळकर व दरेकर यांना एकत्र लढण्याचे सूचित केले. शिक्षण-प्रशिक्षण देणारी संस्था असल्याने फार स्पर्धा-वाद न करता संघात समन्वयातून काम करण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेचाही कुसाळकर यांनी आदर राखला.

९० टक्के मतदान कुसाळकर-दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नोंदवले गेले असल्याने ‘सहकार पॅनेल’चा विजय निश्चित मानला जात आहे. सर्व मतदारांनी, उमेदवारांनी ‘सहकार पॅनेल’ला साथ द्यावी, असे आवाहन कुसाळकर व दरेकर यांनी केले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिमाचलमध्ये पावसाचा कहर; ढगफुटी आणि पूरामुळे आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू
Next Article धोनीने मित्रांबरोबर साजरा केला ४४ वा वाढदिवस

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?