Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर बसवणार जॅमर – टोपे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

राज्यात तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर बसवणार जॅमर – टोपे

Surajya Digital
Last updated: 2021/09/20 at 7:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जालना : राज्यात एक शुभवार्ता आहे.तशी माहिती खुद्द आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. महराष्ट्र राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, मात्र सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. पण लसीकरणाचा वेग वाढवल्यास संक्रमण जास्त होणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या दररोज 13 ते 14 लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे. त्यामुळे नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं असंही टोपे म्हणाले.राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वी राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे वक्तव्य करण्यात आले होते. त्यामुळे आजचे वक्तव्य राज्यासाठी दिलासादायक आहे,राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाकडून गट क आणि ड या पदासाठीच्या 6 हजार 200 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. जॅमर बसवल्यामुळे परीक्षेदरम्यान कॉपी सारख्या प्रकाराला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडेल असंही ते म्हणाले.

दरम्यान, परीक्षा होणार असल्याचे आरोग्य मंत्री म्हणत आहेत. मात्र आजही अनेक उमेदवारांना हॉलतिकिट मिळाले नाही. त्यामुळे परीक्षार्थी संभ्रमात आहे. काही दिवसावर परीक्षा येवून ठेपली आहे. या परीक्षेची अनेक तरुण वाट पाहत होते. पण प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे, ढिसाळ नियोजनामुळे कोणी परीक्षेपासून वंचित राहिल्यास कोण जबाबदार, असा संतापही व्यक्त होत आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #nosign #thirdwave #state #Examcentre #jammer, #राज्यात #तिसऱ्या #लाटेचे #संकेत #आरोग्यविभागाच्या #परीक्षाकेंद्रावर #बसवणार #जॅमर #टोपे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री तुळजाभवानी मातेच्या खजिन्यावर डल्ला मारणा-या नाईकवाडीला सुनावली पोलीस कोठडी 
Next Article दोन अपघातात दोघांचा मृत्यू, गणपती विसर्जनावेळी तरुणाचा बुडून मृत्यू

Latest News

По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?