Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी

Surajya Digital
Last updated: 2021/03/19 at 6:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता नव्या गाईडलाईन्स जारी केल्या. राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले. नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती ५० टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

मुंबईसह राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. राज्यात सोमवारी नव्या १५ हजार ०५१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासांत ४८ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात मृत्यूदर २.२७ टक्के इतका आहे. ही वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नव्या गाईडलाइन्स जागू केल्या आहेत. यानुसार यापुढे राज्यातील सर्व नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले असून मास्क शिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नसेल. याशिवाय आस्थापनांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायझर लावणे ही बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही गाइडलाइन्समध्ये जारी करण्यात आले आहे. याशिवाय शॉपिंग मॉल्सनाही हे नियम अनिवार्य राहतील.

महत्त्वाचे म्हणजे राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. लग्न समारंभासाठी ५० लोकांना परवानगी असेल तर अत्यंसंस्कारात २० पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही.

– कोरोना: राज्य शासनाच्या नव्या गाईडलाईन

* सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवा.

* नाट्यगृहे, सभागृहे यामधील उपस्थिती 50 टक्के असावी.

* सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे.

*धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #state #Government #corona #gaidlines, #राज्यसरकारकडून #कोरोनाच्या #नव्यागाईडलाईन्स #जारी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article या पाच बँकेच्या ग्राहकांनी बाळगावी सतर्कता, अमेरिका – फ्रान्समधून सायबर अटॅक
Next Article तनुश्रीने केले वजन कमी, होणार सक्रिय; नाना, राज ठाकरेंसह बिगबींवर केले होते आरोप

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?