सोलापूर, 2 एप्रिल (हिं.स.)। राज्यात कर्ज माफीचा वाद पेटलेला असतानाच राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सध्या तरी कर्ज माफी देणे शक्य नसल्याचे विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरात सूर मिसळला आहे. मंत्री भरणे यांच्या विधानानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.क्रीडा मंत्री दत्ता भरणे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजनेचा आर्थिक बोजा सरकारवर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आज तरी कर्ज माफी देणे शक्य नाही. उद्या काय होईल हे सांगता येणार नाही. अजित पवार यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनाही कर्ज माफी मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवारांना दोष देणे योग्य होणार नाही.