Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एसटीची मोटरसायकलला धडक; सोलापूर शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टराचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

एसटीची मोटरसायकलला धडक; सोलापूर शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टराचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/03/21 at 10:12 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : मोटरसायकलवरून मित्रासमवेत नळदुर्गहून सोलापूरकडे येत असताना अणदूरजवळ समोरून येणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने डॉक्टराचा मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

विकासकुमार मीना (वय-२१) असे मृताचे नाव आहे. ते सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून सेवेत होते. ते जागीच ठार झाले तर त्यांच्यासमवेत असलेले दुसरे डॉक्टर हे जखमी झाले. या घटनेची हकीकत अशी की, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नळदुर्ग येथील किल्ला पाहण्यासाठी मित्र डॉ.किशोर कुमार पोखरण यांच्यासमवेत गेले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आपल्या मित्राच्या मोटरसायकलवरून पाठीमागे बसून सोलापूरकडे येत असताना दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अणदूरजवळ समोरून येणाऱ्या एसटी बस (क्रमांक एम.एच.१४.बीटी ३४८१) ने समोरून धडक दिली. यात मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले डॉक्टर मिना हे उडून एसटीच्या चाकाखाली गेले तर मोटरसायकल चालवणारे दुसरे डॉ.किशोर कुमार पोखरण (वय-२१) हे उडून बाजूला पडले जखमी अवस्थेत पडले.

दोघांनाही मित्र डॉ. राहुल भारदे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले.उपचारापूर्वीच डॉक्टर मीना हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर डॉक्टर किशोर कुमार पोखरण यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली. या दुर्दैवी घटनेमुळे सिव्हिल रुग्णालय परिसरात मित्र वर्गांनी हळहळ व्यक्त केली. ते गुरुनानक चौकातील डॉक्टरांच्या होस्टेलमध्ये राहत होते.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #SThits #motorcycle #Death #traineedoctor, #एसटीची #मोटरसायकलला #धडक #प्रशिक्षणार्थी #डॉक्टराचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रुग्णालय परिसरात सापडला गावठी बॉम्ब, टायमर वाजल्यानंतर आले लक्षात
Next Article बलात्कारप्रकरणी शिराळ्यातील तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?