Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या पठ्ठ्याने बाईक चोरीला गेल्यामुळे रागातून तब्बल 29 बाईक चोरल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूरच्या पठ्ठ्याने बाईक चोरीला गेल्यामुळे रागातून तब्बल 29 बाईक चोरल्या

Surajya Digital
Last updated: 2022/09/04 at 4:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : सोलापूर येथे पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या टोळीला पकडले आहे. यावेळी पोलिसांनी चोरीला गेलेल्या 29 बाईक जप्त केल्या आहेत. ही कारवाई सोलापूर शहर गुन्हेने केली. यामध्ये तब्बल आठ लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. As many as 29 bikes were stolen from the market yard out of anger due to the theft of bikes by Pattha of Solapur

 

यात तब्बल आठ लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मच्छिंद्र भागवत जाडकर, सचिन जालिंदर चव्हाण (रा. खडकपूर मोडनिंब, ता.माढा) आणि दत्तात्रय रावसाहेब शेळके (रा. शिंदे शेळगी अरण, ता.माढा जि.सोलापूर) अशा या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये एका पठ्ठ्याने त्याची बाईक चोरीला गेली म्हणून एक दोन नव्हे तर तब्बल 29 बाईक चोरल्यात. या बाईकचोरासह त्याच्या अन्य साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

 

जुना बोरामणी नाका परिसरामध्ये चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी एक इसमे येणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्याला सापळा लावून पकडले असता त्याने आपले नाव मच्छिंद्र भागवत जाडकर असे सांगितले. तसेच सोलापूर परिसरातून त्याने आणि त्याचे दोन साथीदाराने मोटरसायकल चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. त्यांच्याकडून जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीत चोरीला गेलेल्या चोरीच्या 29 मोटारसायकल जप्त केल्या.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

सोलापूर क्राईम ब्रांच पोलिसांनी एका संशयित चोरट्याचा तपास सुरु केला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांची कसून चौकशी सुरु केली. यानंतर या चोरट्याच्या अन्य दोघा जणांची माहिती मिळवत पोलिसांनी त्यांनाही अटक केली. एकूण तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. तब्बल 29 दुचाकी या तिघा जणांच्या टोळीने चोरल्या होत्या.

 

सोलापूर पोलिसांनी नुकताच दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या वाहन चोरणाऱ्या टोळीकडून तब्बल 29 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सोलापूर मार्केट यार्ड परिसरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याच टोळीने मार्केट यार्डात दुचाकी चोरट्याचा सपाटा लावला होता. अखेर सोलापूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.

विशेष म्हणजे या टोळीच्या म्होरक्याचं वाहन मार्केट यार्ड परिसरातून चोरीला गेलं होतं. त्यामुळे रागापोटी त्याने इतर साथीदारांच्या मदतीने एक-दोन नव्हे तर तब्बल 29 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिलीय. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण 8 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #29bikes #stolen #marketyard #anger #theft #bikes #Pattha #Solapur #crime, #सोलापूर #पठ्ठ्याने #बाईक #चोरी #रागातून #तब्बल #29बाईक #चोरल्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीचे सुरेश खाडेंकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची तात्पुरती जबाबदारी
Next Article टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रींचे अपघाती निधन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?