Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

admin
Last updated: 2025/06/23 at 6:08 PM
admin
Share
1 Min Read
crime
SHARE

सोलापूर, 23 जून (हिं.स.)।

कार जाण्यासाठी वाट न सोडणाऱ्या तरुणांसमोर हॉर्न वाजविणाऱ्या चालकास बाजूने जायला सांगितले. त्यावेळी एकमेकांना शिवीगाळ झाली आणि काही वेळाने दोन गटात दगडफेक सुरू झाली. त्यात अल्पवयीन मुले देखील सहभागी असल्याचेेही समोर आले. ही घटना भवानी पेठेतील घोंगडे वस्ती परिसरात घडली आहे. दगडफेकीत दुचाकीसह अन्य वाहनांचे नुकसान झाले आहे. तिघेजण जखमी झाले आहेत.

गटागटाने थांबून महिलांकडे पाहणे, रस्त्यावर थांबून रस्ता अडविणे, मुलींकडे वाईट हेतूने पाहणे, वाहने भरधाव चालविणे, दुसऱ्या परिसरातील तरुणांना त्या भागात बोलावण्याचे प्रकार सतत सुरू होते. त्यामुळे दोन गटात काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते, त्याचा उद्रेक झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

दगडफेकीची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज मुलाणी हेही तेथे उपस्थित होते. त्यावेळी दंगा नियंत्रण पथक, शीघ्र प्रतिसाद दलाचे अंमलदारही बोलावण्यात आले होते. पोलिसांनी परिसरात गस्त सुरू केली होती.

You Might Also Like

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता

Latest News

बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?