Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : शिंदे गटाची वाढती ताकद भाजपसाठी डोकेदुखी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

सोलापूर : शिंदे गटाची वाढती ताकद भाजपसाठी डोकेदुखी

Surajya Digital
Last updated: 2022/09/25 at 12:05 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

Solapur: The growing strength of the Shinde group is a headache for the BJP Vijay Deshmukh

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ भाजपच्या नेत्यांची मोठी कसोटी लागणार

सोलापूर / अजित उंब्रजकर : शिंदे गटाची वाढती ताकद भाजपची डोकेदुखी बनण्याची शक्यता?  राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होऊन महाआघाडीची सत्ता गेली तर शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपची सत्ता आली. यानंतर संपूर्ण राज्यात शिंदे गटाची ताकद वाढत आहे. सोलापूर शहरातही अशीच परिस्थिती असून शिंदे गटात अनेक माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे तर आणखी काही माजी नगरसेवक प्रवेशासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सर्व महापालिका निवडणुका शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोलापुरात शिंदे गटाची वाढणारी ताकद ही आगामी काळात भाजपची डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे.

 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना आपलीच आहे, असा दावा केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना असा दावा केल्यामुळे संपूर्ण राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याचा अनेक नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा कल वाढला आहे. सोलापुरातही अशीच परिस्थिती आहे. सोलापुरात एकनाथ शिंदे गटात माजी नगरसेवक, अमोल शिंदे मनोज शेजवाल, हरिभाऊ चौगुले यांच्यासह अनेक मोठे पदाधिकारी गेले आहेत. शिवाय आणखी काही माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत.

 

मध्यंतरी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा सोलापुरात दौरा झाला. त्यावेळी त्यांनी आगामी काळात अनेक मोठमोठे नेते शिंदे गटात येतील, असे वक्तव्य केले होते. शिंदे गटात वाढणारा नेत्यांचा प्रवेश हा आगामी काळात भाजपसाठी डोकेदुखी बनणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी राज्यातील सर्व महापालिका निवडणुका शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. जर महापालिका निवडणुकीत या दोन दोन्ही पक्षाची युती झाल्यास सोलापुरात जागा वाटपात अडचण होण्याची शक्यता आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

जे जे नेते सध्या शिंदे गटात प्रवेश करू इच्छित आहात त्यापैकी अनेक जण पुन्हा महापालिकेसाठी इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी द्यायची झाल्यास भाजपच्या जागा कमी होणार आहेत. सध्या भाजपकडे ही प्रत्येक प्रभागात उमेदवार आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत शिंदे गट आणि भाजपची युती झाल्यास अनेक प्रभागात अडचण होण्याची शक्यता आहे.

सध्या शिंदे गटात जे जे प्रवेश करत आहेत ते सध्या बहुतांश शहर उत्तर मधीलच पदाधिकारी आहेत. शहर उत्तर भाजपचा हा बालेकिल्ला आहे तेथे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पूर्वीपासूनच जोरदार बिल्डिंग लावली आहे. कमीत कमी 30 नगरसेवक शहर उत्तरमधून निवडून आणायचे असा विडा आमदार विजयकुमार देशमुख यांनी उचलला आहे.

मात्र शिंदे गट आणि भाजपची युती झाल्यास येथील काही जागा शिंदे गटाला भाजपला सोडावे लागणार आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपची पंचाईत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यामुळे शिंदे गटाची वाढती ताकद भाजपच्या पर्यायाने आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासाठी मोठे दुखी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

□ भाजपच्या नेत्यांची मोठी कसोटी लागणार

 

भाजपला बंडखोरीची भीती 2019 ते 2021 दरम्यान राज्यात महाआघाडीची सत्ता असतानाही सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार, असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांना होता त्यामुळे अनेकांनी गेल्या दोन वर्षापासूनच महापालिकेची तयारी सुरू केली होती आता सत्तांतर होऊन भाजपची सत्ता राज्यात आली आहे.

त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास आणखीनच वाढला आहे. त्यामुळे भाजपकडून प्रत्येक प्रभागात तीन ते चार जण इच्छुक आहेत अशा परिस्थितीत भाजप आणि शिंदे गटाची युती झाली आणि शिंदे गटाला काही जागा सोडण्याचा निर्णय झाल्यास भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात उमेदवारी देताना आणि समजूत घालताना भाजपच्या नेत्यांची मोठी कसोटी लागणार आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Solapur #growing #strength #Shindegroup #headache #BJP #VijayDeshmukh, #सोलापूर #शिंदेगट #वाढती #ताकद #भाजप #डोकेदुखी #राजकारण #विजयदेशमुख
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राधाकृष्ण विखे – पाटील सोलापूर, अहमदनगर तर देवेंद्र फडणवीस 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री
Next Article युवा सेनेच्या सोलापूर शहर युवा अधिकारीपदी विठ्ठल वानकर; शहर – जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?