नवी दिल्ली, २० मे(हिं.स): मंगळवारी बंगालच्या उपसागरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून परिसरात काही काळ अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) नुसार, भूकंपाचं केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर खोल होतं. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवण्यात आली आहे.
उत्तराखंड आणि मध्य प्रदेशमध्येही आज भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसनुसार, उत्तराखंडमधील पिथौरागड येथे दुपारी १:३२ वाजता जमिनीत हालचाल झाली. या भूकंपाची तीव्रता २.४ रिश्टर स्केल इतकी होती. तर, मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात दुपारी १:१२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता २.५ इतकी होती.
सुदैवाने, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी शांतता आणि सावधगिरी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.