Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यालयाच्या शौचालयात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या, मोहोळमधील घटना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

विद्यालयाच्या शौचालयात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या, मोहोळमधील घटना

Surajya Digital
Last updated: 2021/11/30 at 6:52 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर/ मोहोळ : मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील एका सतरा वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्याने शौचालयाच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटन काल सोमवारी (ता. 29) रात्री आठ वाजता घडली.

देवानंद ज्ञानेश्वर भोसले असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून, त्यास आत्महत्येस प्रवृत्त कोणी केले? आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी तक्रार मृत देवानंदच्या नातेवाइकांनी केली. खरा प्रकार समजल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका देवानंदच्या आई-वडील व नातेवाइकांनी घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

आमची दखल घ्या, गरिबाला न्याय द्या, असे म्हणत नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात तसेच पोलिस ठाण्यात आक्रोश केला. यावर अमोल भारती (उपविभागीय पोलिस अधिकारी) म्हणाले, मृत देवानंदच्या सर्व नातेवाइकांचे म्हणणे विचारात घेऊन त्यांच्या ज्या काही शंका असतील त्यांचे निरसन करू. शवविच्छेदन अहवाल आल्यावरच आत्महत्या नेमकी कशामुळे केली हे समजू शकेल. प्रथमदर्शनी त्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा दिसत नाहीत. तपास योग्य पद्धतीने करून मृत देवानंदला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. संतप्त होऊन नातेवाईकांनी सकाळी थोडावेळ मुख्य रस्ता रोखून धरला होता. प्रशासन आणि पोलिसांकडून आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले.

प्रकरणी राजेंद्रप्रसाद विष्णुपंत नाडगौडा यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून, तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवानंद भोसले हा पारधी समाजाचा विद्यार्थी बारावीत शिकत होता. तो खूप हुशार होता. रात्री आठ वाजता सर्व विद्यार्थी भोजनालय कक्षात जेवणासाठी जातात, त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. हजेरी घेताना नेमका देवानंद गैरहजर होता, कुठेही दिसला नाही. शिक्षकांनी चौकशी केली असता तो दिसून आला नाही. मात्र एका सदनातील शौचालय बंद असल्याचे आढळून आले. या शाळेमध्ये सुमारे 350 मुले आहेत. त्यात 205 मुले व 145 मुली आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आत कोण आहे, असे शिक्षकांनी हाका मारल्या, मात्र आतून प्रतिसाद आला नाही. ही घटना शिक्षकाने वरिष्ठांना व पोलिसांना कळविली. पोलिस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनीही हाका मारल्या, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच देवानंद याने शौचालयाच्या खिडकीला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत देवानंद याचा मृतदेह विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमक्ष उतरवला व मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला.

दरम्यान, घटनास्थळाला प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार प्रशांत बेडसे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी भेट दिली.

* परस्पर मृतदेह हलवल्याचा आरोप

मयताची आई अश्विनी भोसले हिने, माझा मुलगा आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता, त्याच्यावर कोणी ही परिस्थिती आणली याची चौकशी झाली पाहिजे, महाविद्यालयाच्या विरोधात आमची तक्रार आहे, तसेच आमच्या पारधी समाजाचा तो एकमेव व हुशार विद्यार्थी होता. ज्यावेळी देवानंदने आत्महत्या केली त्यावेळी विद्यालय प्रशासनाने आम्हाला का कळवले नाही, आमच्या परस्पर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात का आणला, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी मागणी करत सर्वांसमक्ष टाहो फोडला.

* कलेक्‍टर होण्याचे स्वप्न

देवानंद हा मी कलेक्‍टर होणार, असे तो सर्वांना सांगत होता, त्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती, हे सांगताना आई अश्विनीला दोन वेळा चक्कर आली. देवानंदचा करमाळा तालुक्‍यात असताना हुशार विद्यार्थी म्हणून पुढारी – अधिकाऱ्याच्या हस्ते सत्कारही केला होता. एवढा हुशार विद्यार्थी आत्महत्या करेलच कसा, असा सवाल आई-वडिलांनी उपस्थित केला.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Student #commits #suicide #school #toilet #incident #Mohol, #विद्यालय #शौचालय #गळफास #विद्यार्थी #आत्महत्या #मोहोळ #घटना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील ७०६ ग्रामपंचायतीत प्लास्टीकबंदीचा घ्या ठराव, दिल्या सक्त सूचना
Next Article बंदच ! मुंबई – पुण्यात उद्यापासून शाळा उघडणार नाही

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?