Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी आक्रमक, त्यात रोहित पवारांचे ट्वीट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी आक्रमक, त्यात रोहित पवारांचे ट्वीट

Surajya Digital
Last updated: 2021/03/11 at 5:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : राज्य सेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला. वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिलीय.

14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने पुण्यात अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तसेच 14 मार्चलाच एमपीएससीची परीक्षा घ्यावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आज पुण्यातील नवी पेठ, शास्त्री रोड, सदाशिव पेठ येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरही सामील झाले आहेत.

गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असताना आता पुन्हा एकदा 14 मार्च रोजी होणारी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुढे ढकलून विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पुण्यातील नवी पेठ येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको सुरु केले असून ठिय्या आंदोलन केले आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक; अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर नवी पेठे तील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत. नवी पेठेत मोठ्या वाहतूक कोंडी झाली असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आली आहे.

पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले आहे. हे आंदोलन भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात करण्यास सुरुवात केली आहे. यात सोलापूर माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांनीही सहभाग घेतला आहे.  नव्या पेठेतील रस्त्यात विद्यार्थ्यांना घेऊन पडळकरांनी ठिय्या मांडला.

पोलिसांनी या आंदोलक विद्यार्थ्यांना रस्त्यातून हटवण्यास सुरुवात केल्यानंतर प्रचंड गोंधळ सुरु झाला. कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात एमपीएससी परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. यापूर्वी 11 ऑक्टोबर 2020 रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, तेव्हाही मराठा आरक्षण प्रश्नांबाबत महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

* एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे – रोहित पवार

कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची परीक्षाही झाली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे. ट्विटरवरून रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #Students #aggressive #postponing #MPSCexam #RohitPawar's #tweet, #एमपीएससी #परीक्षा #पुढेढकलली #वेळापत्रक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुसाईड नोटमध्ये ‘अर्णव’चे नाव असताना विधानसभा हादरून का सोडले नाही
Next Article शिवसिद्ध बुळ्ळाने किती बनावट जातीचे दाखले बनवले ? तपासात प्रशासनही झाले थक्क

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?