अहिल्यानगर दि. 22 एप्रिल (हिं.स.) :- विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या आवडीच्या खेळाकडेही लक्ष द्यावे.आता क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले असून त्यामध्ये करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत.कोमल वाकळे या विद्यार्थिनी शिक्षणाबरोबर वेट लिफ्टिंग या खेळामध्ये चांगली कामगिरी करून आपल्या राज्याचे नाव लौकिक केले असल्यामुळे शासनाच्या वतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला.
जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येत असते कोमल वाकळे यांचा क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे अनुकरण शालेय विद्यार्थ्यांनी घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार कोमल वाकळे यांना मिळाल्याबद्दल सावेडीकरांच्या वतीने सत्कार सप्पन्न झाला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे,कोमल चे वडील- नारायण वाकळे, आई- अलका नारायण वाकळे, भाऊ – इंजी. सुरज नारायण वाकळे, वहिनी – शिल्पा सुरज वाकळे, आजी- राऊबाई वाकळे, सुशीला वाकले, काका- इंजी. विजय वाकळे, डॉ. राजेंद्र वाकळे, डॉ. बाळासाहेब वाकळे, सुरेश वाकळे, सतिश वाकळे, संदीप वाकळे आदि उपस्थित होते.
पहिले नगर शहरात क्रीडा खेळाबाबत कुठल्याही सुख सुविधा व मार्गदर्शन नसतानाही कोमल वाकळे नेे वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळून आपल्या शहराचे नाव उज्वल केले.तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानामुळे इतर खेळाडूंमध्ये ऊर्जा व प्रेरणा निर्माण केली असे मत माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी व्यक्त केले. शालेय जीवनापासूनच खेळाची आवड निर्माण होती म्हणून शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला जात होता त्यानंतर मी वेटलिफ्टिंग या खेळामध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहिले व खेळायला सुरुवात केली विविध स्पर्धेमध्ये सुवर्णपदक ब्रांच पदक कास्यपदक मिळाले आता शासनाचा सर्वोच्च शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला असून माझ्या कष्टाचे चीज झाले आई-वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम केले असल्यामुळेच मी क्रीडा क्षेत्रामध्ये यशस्वीपणे करू शकले असल्याचे मत वेटलिफ्टिंग खेळाडू कोमल वाकळे यांनी व्यक्त केले.