Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार – प्रताप सरनाईक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार – प्रताप सरनाईक

admin
Last updated: 2025/06/15 at 3:22 PM
admin
Share
2 Min Read
Oplus_16908288
SHARE

मुंबई, १५ जून (हिं.स.) : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जुन पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६% इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ” योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. आता विद्यार्थ्यांना पास साठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्या कडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.

या संदर्भात १६ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.

या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

You Might Also Like

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर

शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे

सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले

राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हेलिकॉप्टर अपघातातील 7 मृतकांपैकी 3 जण महाराष्ट्रातील
Next Article कर्तव्यादरम्यान झालेल्या वादानंतर बीएसएफ जवानाकडून सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
देश - विदेश June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?