Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Solapur Election निवडणूक महापालिकेची मात्र रंगीत तालीम विधानसभेची; तालीम विधानसभेची, लढाई वर्चस्वाची
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

Solapur Election निवडणूक महापालिकेची मात्र रंगीत तालीम विधानसभेची; तालीम विधानसभेची, लढाई वर्चस्वाची

Surajya Digital
Last updated: 2022/06/19 at 1:27 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

सोलापूर : अजित उंब्रजकर

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ जुळे सोलापुरात होणार आरपारची लढाई□ काँग्रेस- सेनेपुढे खडतर आव्हान□ नियमभंगामुळे बार्शीतील नऊ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश

आगामी महापालिका निवडणुकीत शहर उत्तर बरोबरच दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २८ जागांसाठी आ. सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने या दोन नेत्यांमध्ये जोरदार टशन पहायला मिळणार आहे. निवडणूक महापालिकेची मात्र रंगीत तालीम विधानसभेची असंच काहीसं चित्र असून वर्चस्वाची दिसून येत आहे. Election of Municipal Corporation, however, colorful training of Vidhan Sabha; Subhash Deshmukh Dilip Mane of Talim Assembly, Battle Dominance

निवडणुकीमध्ये दक्षिणमधील २३ पैकी १२ जागा निवडून आणत आ. देशमुख यांनी माने यांच्यावर मात केल्याचे दिसून आले. यंदाही आ. देशमुख हा चमत्कार करणार की दिलीप माने त्यांना जड जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरित ही निवडणूक महापालिकेची असली तरी याकडे आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात आहे. मागील

२०१७ च्या महापालिकेत दक्षिणमध्ये २२ नगरसेवक होते. त्यापैकी भाजपचे १२, काँग्रेसचे ६ तर राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी दोन तर एमआयएमचा एक नगरसेवक निवडून आला होता. गतवेळी दिलीप माने काँग्रेस पक्षात होते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्येच खरी लढाई दिसून आली. आता दिलीप माने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माने गटाचे नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये जाणार यात कोणतीही शंका नाही.

दिलीप माने हे राष्ट्रवादीमध्ये जाताना काही प्रभागातील उमेदवार त्यांच्या पसंतीने ठरवण्याचा शब्द घेऊन जाणार असल्याचे बोलले जात आहे. माने गटाकडून प्रभाग ३५, ३७ आणि ३८ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरल्याचीही माहिती आहे. गतवेळी दक्षिणमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार होते, यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे आ. सुभाष देशमुख हे गेल्या वेळेपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची हजेरी दिसून येत आहे. सध्या त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांच्याकडे त्याचे नियोजन देण्यात आले आहे. यंदा दक्षिणमध्ये भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी देताना आ. देशमुख यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

आताच कोणाला कामाला लागा असे सांगून सर्वांची नाराजी ओढावून न घेण्याची दक्षता आ. देशमुख यांनी बाळगल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत आ. देशमुख यांनी कोणालाही शब्द दिलेला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून ते आपले उमेदवार निवडणार यात शंका नाही. ऐनवेळी ते आपले पत्ते ओपन करतील, असे बोलले जात आहे. दक्षिणमधून अनेक प्रभागात आ. देशमुख सर्वांना अनपेक्षित असे उमेदवार ऐनवेळी काढणार असल्याचे समजते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

□ जुळे सोलापुरात होणार आरपारची लढाई

दक्षिण मतदार संघातील जुळे सोलापूर भाग हा प्रामुख्याने भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. येथील बहुतांश भागात सुशिक्षित मतदार आहेत. त्यामुळे येथून भाजपला विजय सोपा जातो, असे आतापर्यंत दिसून आले आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुळे सोलापूर भागात तगडे उमेदवार देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे या भागात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात आरपारची लढाई पाहायला मिळणार आहे.

 

□ काँग्रेस- सेनेपुढे खडतर आव्हान

 

दिलीप माने हे राष्ट्रवादीत गेल्यामुळे काँग्रेसला या भागात मोठी कसरत करावी लागणार आहे. आ. प्रणिती शिंदे, शहाराध्यक्ष प्रकाश वाले यांचे अद्याप दक्षिणमधील प्रभागांकडे लक्ष नाही. त्यामुळे दक्षिणमधील सर्व प्रभागात काँग्रेसला उमेदवार मिळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचीही परिस्थिती याहून वेगळी नाही.

गतवेळी त्यांचे दक्षिणमध्ये केवळ दोन नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांची कामगिरी फारशी उंचावणार नाही, असे बोलले जात आहे. दक्षिणमध्ये सेनेचे नेतृत्व करणार कोण असा प्रश्न पक्षापुढे आहे. त्यामुळे दक्षिणमध्ये काँग्रेस आणि सेनेपुढे खडतर आव्हान असणार आहे.

 

 

 

 

□ नियमभंगामुळे बार्शीतील नऊ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश

 

बार्शी : बियाणे विक्री बाबतच्या नियमांचा भंग केल्यामुळे कृषी विभागाने चांगला दणका दिला आहे. बार्शी तालुक्यातील ९ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश दिला.

बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश दिलेल्यामध्ये बार्शी शहरातील  २ व वैराग येथील ७ दुकानांचा यात समावेश आहे. जेवढ्या बियाण्याचा साठा आवश्यक कागदपत्र सहित सापडला नाही, तेवढ्याच बियाण्याच्या संदर्भात हा विक्री बंद आदेश आहे. उर्वरित बियाणे कृषी सेवा केंद्र चालक विक्री करू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली असून शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले असून बार्शी व वैराग येथे उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र कांबळे,  तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत.

या कारवाईमध्ये प्रभारी गुणनियंत्रण कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील यांच्यासह वैराग मंडळचे कृषी पर्यवेक्षक एन बी जगताप, संजय कराळे, भारत महांगडे, रघुनाथ कादे, अण्णा नलवडे इत्यादी उपस्थित होते.

 

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

संजय गायकवाडांना समज देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

TAGGED: #Election #Municipal #Corporation. #however #colorful #training #VidhanSabha #SubhashDeshmukh #DilipMane #Talim #Assembly #Battle #Dominance, #निवडणूक #महापालिका #दक्षिण #सोलापूर #रंगीत #तालीम #विधानसभा #लढाई #वर्चस्व #दिलीपमाने #सुभाषदेशमुख
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संजयमामांची राज्याच्या राजकारणात चर्चा, अपक्षांची राज्याच्या राजकारणात ताकद वाढली
Next Article वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात, एक ठार तर 30 जखमी

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?