Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुन्हेगाराकडून तब्बल 32 मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

गुन्हेगाराकडून तब्बल 32 मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश

Surajya Digital
Last updated: 2023/04/11 at 9:07 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस, शहर गुन्हे शाखेची कामगिरी○ खल्लास करतो म्हणत डॉक्टरने महिलेच्या डोक्यात घातली खुर्ची

सोलापूर : मार्केट यार्ड परिसरात थांबलेला ट्रकचालक, शेतकरी ग्राहकांचे मोबाइल चोरून, हिसकावून नेत कमी किमतीत विकल्याप्रकरणी दोन हमालांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 32 मोबाइल पोलिसानी जप्त केले आहेत. Police succeeded in seizing as many as 32 mobile phones from criminals, Solapur

 

अक्षय सीताराम कांबळे (वय-२२,रा.भारतरत्न, इंदिरानगर), इम्रान शब्बीर इनामदार (वय-२४,रा. भारतरत्न, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. गुरुवारी एका ट्रकचालकाच्या हातून दोन दुचाकीस्वारांनी दमदाटी करत मोबाइल हिस्कावून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

 

या गुन्ह्यांचा तपास करताना जोडभावी पोलिसांनी आरोपींची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केले. दरम्यान त्यांच्याकडून ३ लाख ७७ हजार रुपयांचे ३२ मोबाइल जप्त करण्यात आले आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून,त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचे पोलिसानी सांगितले.

 

ही कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त संतोष गायकवाड, जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि पवार, पोसई चक्रधर ताकभाते, हेडकॉस्टेबल श्रीकांत पवार,खाजप्पा आरेनवरू, भारत गायकवाड, शीतल शिवशरण,सचिन बाबर, सुरेश जमादार, अय्याज बागलकोटे,स्वप्नील कसगावडे, सोमनाथ थिटे, उमेश कात्रजकर यांनी केली.

 

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस, शहर गुन्हे शाखेची कामगिरी

 

सोलापूर  : शहरातील विविध ठिकाणी चोरलेल्या दोन दुचाकी विकण्यासाठी आलेल्या चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.

अरमान रफिक बेलालकर (वय-२६, रा.सलगर वाडी, डोणगाव रोड) असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहे.गुन्हे शाखेतील सपोनि महाडिक चोरीच्या तपासात असताना त्यांच्या पथकातील भारत पाटील यांना चोरून आणलेली दुचाकी विक्रीसाठी डोणगाव रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली.या माहितीवरून पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने दोन ठिकाणाहून गाडी चोरल्याचे कबूल केले.दरम्यान, त्याच्याकडून पोलिसांनी दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे,गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे,सपोनि श्रीनाथ महाडीक, पोलिस नाईक तात्यासाहेब पाटील,भारत पाटील,राजकुमार वाघमारे,अजय गुंड,वसीम शेख, सतीश काटे यांनी केली.

○ खल्लास करतो म्हणत डॉक्टरने महिलेच्या डोक्यात घातली खुर्ची

 

• डॉक्टर पती-पत्नीवर गुन्हा

 

सोलापूर : तू कामावर नाही आली तर तुला खल्लास करतो असे म्हणत शिवीगाळ करत डॉक्टरने महिलेच्या डोक्यात प्लास्टिकची खुर्ची घालून जखमी केल्याची घटना दि.८ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान डॉक्टरांच्या घरी घडली.

याप्रकरणी गीता अरविंद भाकरे यांनी (रा.देशमुख पाटील वस्ती,आमराई) त्यांच्या डॉक्टर विजयकुमार इंगळे व त्यांची डॉ.पत्नी दीपा विजयकुमार इंगळे (दोघे.रा.अभिमानश्री नगर,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी व उमा असे दोघेजण मिळून डॉक्टर इंगळे यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी डॉ.इंगळे यांना तुम्ही माझे जावई यांना फोन करून माझ्या कामाबद्दल बोललात असे विचारले असता,इंगळे यांनी फिर्यादी यांना उमा ही कामावर न आल्याने मी तुमच्या जावई यांना फोन केला होता, तुम्ही आता कामावर येणार आहात की नाही ते सांगा असे दोघींना म्हणाले.त्यावेळी उमा यांनी डॉक्टर इंगळे व त्यांची पत्नी डॉ.दिपा यांना ती कामावर येणार नसल्याचे सांगितले.

त्यावेळी डॉक्टर इंगळे व त्यांची पत्नी यांनी उमा यांना घराबाहेर पाठवून घराचा दरवाजा आतून लावून फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालू लागले व मागील महिन्याचा उमा यांना दिलेला पगार आताच्या आता आम्हाला परत द्या असे म्हणाले. त्यावेळी डॉक्टर इंगळे यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून प्लास्टिकची खुर्ची उचलून डोक्यात घालत खल्लास करतो, असे म्हणून धमकी दिली आहे.तसेच डॉक्टर दीपा यांनी झालेल्या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्याला ओरबडले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Police #succeeded #seizing #mobile #phones #criminals #Solapur #twowheller, #सोलापूर #गुन्हेगार #तब्बल #32मोबाईल #जप्त #पोलिस #यश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा; भाजपच्या वतीने महापालिकेत माठ फोडो आंदोलन
Next Article शरद पवारांच्या विधानावरून उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर; चार नेत्यांमध्ये झाली एक तास चर्चा

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?