वेळापूर : तांदुळवाडी व फळवणी तालुका माळशिरस येथे रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी तीक्ष्ण हत्या-याने टायर फोडून दोन वाहनांचे १ लाखा पेक्षा जास्त नुकसान केले आहे. पंढरपूरानंतर टायर फोडून नुकसान करण्याचा प्रकार माळशिरसमध्ये घडला आहे. Sugarcane tractor tires burst in Malshiras after Pandharpur; Farmers lost more than one lakh
याबाबत अधिकृत वृत असे की गुरूवारी ( दि. २७) रात्रीच्या १०.३० च्या सुमारास तांदुळवाडी ते साळमुख रोडवर नायरा पेट्रोल पंपाजवळ महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर एमएच१३ एजे २५६२ व ट्रेलर एमएच ४५ इ १४९२ ट्रेलर एम एस ४५ इ १४९३ हे उसाने भरलेले वाहन अकलूज येथील सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना हे ऊसाचे वाहन नायर पंपाजवळ थांबवून ड्रायव्हर मालकाकडून जेवणाचा डबा घेत असताना तांदुळवाडी गावाच्या दिशेने चार अनोळखी इसम युनिकॉर्न, स्प्लेंडर मोटरसायकल वरून येऊन तीक्ष्ण हत्या-याने दोन्ही ट्रेलरची टायर फोडून ४५ हजार रुपयांचे नुकसान केले असल्याची फिर्याद सुरज बाळासाहेब कांबळे तांदुळवाडी यांनी वेळापूर पोलीस स्टेशनला दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्याचबरोबर त्याच रात्री ११.०० सुमारास फळवणी ते साळमुख रोडवर फळवणी कॅनालजवळ संजय मोरे (महुद ता. सांगोला ) यांचे ट्रॅक्टर वाहन माळीनगर साखर कारखान्याकडे जात असताना निरा कॅनाल फळवणी येथे अडवून ट्रॅक्टर व दोन्ही ट्रेलरची टायर फोडून दोन्ही वाहनांचे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
याचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे उप सपोनी संजय राऊत हे अधिक तपास करीत आहेत. उसाच्या दरावरून उस वाहनांच्या टायरची तोडफोड सुरू झाल्याने ऊस वाहतूक वाहन मालकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जी वाहने ऊस वाहतूक करत आहेत. त्यांनी रात्रीच्या सुमारास आपले वाहन कारखान्यापर्यंत जाईपर्यंत बरोबर वाहन मालकांनी संरक्षक माणसे घेऊन काळजी घ्यावी. वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत दसुर ते श्रीपुर वेळापूर व कोळेगाव ते फळवणी मळवली वेळापूर खंडाळी पर्यंत पोलीस कर्मचारी पोलीस वाहन हे राञभर पेट्रोलिंग करणार आहेत. जे कोणी वाहनांचे टायर फोडून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतायेत अशावर वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदवून कारवाई केली जाणार असल्याचे निलेश बागाव (वेळापूर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी) यांनी म्हटले.
