Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: झोपेत असताना ट्रॅक्टरमधून पडल्याने ऊसतोड कामगार ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

झोपेत असताना ट्रॅक्टरमधून पडल्याने ऊसतोड कामगार ठार

Surajya Digital
Last updated: 2023/03/19 at 5:28 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 साखरपुड्यात होणारा बालविवाह टळला; वधू व वराकडील मंडळींना फुटला घाम

सोलापूर – कर्नाटकात ऊसतोडीचे काम आडवून बिऱ्हाडासहित गावाकडे जात असताना झोपेतून ट्रॅक्टरमधून पडल्याने ४३ वर्षीय ऊसतोड कामगार जागीच मरण पावला. हा अपघात विजापूर रोडवरील अशोक नगर येथे शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास घडला. Sugarcane worker dies after falling from tractor while sleeping Beed Karnataka

संदिपान अर्जुन साबळे (वय ४३ रा . पिंपळखेड जि.बीड) असे मयताचे नाव आहे. तो एमएच ४४- झेड -०५१७ या ट्रॅक्टर मधील ड्रायव्हरच्या बाजूला बसून प्रवास करीत होता. तर समोरच्या ट्रॅक्टरमध्ये त्याची पत्नी आणि इतर मजूर होते. ते सर्वजण सोलापूर मार्गे बीड येथे निघाले होते. पहाटे दोनच्या सुमारास विजापूर रोडवरील अशोक नगर तो झोपेतून खाली पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला. या अपघाताची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून हवालदार सोनार पुढील तपास करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 साखरपुड्यात होणारा बालविवाह टळला; वधू व वराकडील मंडळींना फुटला घाम

सोलापूर : मंगळवेढा शहराजवळील मंगल कार्यालयात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर २५ वर्षे वयाच्या एका मुलाचा साखरपुड्यात होणारा बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. फेसबुक, व्हॉट्सअॅपचा जमाना असतानाही मंगळवेढ्यातील बालविवाहाची मालिका संपता संपेना. परिणामी पालकांना आत्मचिंतन करण्याची आली वेळ आली आहे.

शहरालगत असलेल्या बायपास रोडवर जोगेश्वरी मंगल कार्यालयात साखरपुडा कार्यक्रमात बालविवाह होणार असल्याची माहिती डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी शहर बीटचे पोलीस हवालदार हजरत पठाण, महिला पोलीस नाईक सुनीता चवरे, पोलीस नाईक कविता सावंत, पोलीस शिपाई अतुल खराडे, अमोल राऊत, शिवाजी काळे यांचे पथक त्या ठिकाणी पाठवून शहानिशा केली.

 

शहनिशा केली असता हळदीच्या कार्यक्रमात रेड्डे येथील शिक्षण घेणारी १७ वर्षीय मुलगी तर लेंडवेचिंचाळे येथील २५ वर्षीय मुलाबरोबर बालविवाह करण्याची तयारी सुरु असतानाच पोलिसाचे पथक अचानक धडकले. पोलीस पाहून वधू व वराकडील मंडळींना घाम फुटला. पोलीस पथकाने संपूर्ण चौकशी करून वधू-वरासहीत आई-वडिलांना मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणून त्यांचे समुपदेशन केले. मुलीचे वय १८ वर्षे झाल्याशिवाय विवाह करणार नसल्याची मानसकिता तयारी केली गेली. यावेळी महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा शुभांगी सुर्यवंशी या उपस्थित होत्या. समुपदेशन केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलींस सोलापूर येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.

 

बालविवाह रोखण्याची सर्व जबाबदारी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर असतानाही त्यांची मानसिकता मात्र बालविवाह रोखण्याची दिसून येत नाही. दोन आठवड्यापूर्वी गुंजेगाव येथील बालविवाह झाल्याच्या तक्रारी सुज्ञ नागरिकांनी पोलीसांकडे केल्या होत्या. जिल्हाधिकारी मिलिंद शभरकर यांनी कारवाईचे हत्यार उपसावे अशी मागणी आता सुज्ञ जनतेमधून पुढे येऊ लागली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Sugarcane #worker #dies #falling #tractor #sleeping #Beed #Karnataka, #झोप #ट्रॅक्टर #पडल्याने #ऊसतोड #कामगार #ठार #बीड #कर्नाटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आफ्रिकेतील काजूवर पंढरपूरमध्ये प्रक्रिया; बेरोजगारांच्या हाताला काम देतोय काजू प्रक्रिया उद्योग
Next Article नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आजी माजी आमदार अधिकाऱ्यासह शेतकऱ्याच्या बांधावर; पंचनामे सुरू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?