Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नगरसेविकेची गळफास घेऊन आत्महत्या; मंगळवेढ्यातील हल्ल्याप्रकरणी आरोपीस कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

नगरसेविकेची गळफास घेऊन आत्महत्या; मंगळवेढ्यातील हल्ल्याप्रकरणी आरोपीस कोठडी

Surajya Digital
Last updated: 2021/11/15 at 6:20 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

यवतमाळ : यवतमाळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथील नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण सभापती म्हणून काम केलेल्या नगरसेविकेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुरेखा मोहन मेंडके (वय 35) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेखा मेंडके यांनी काँग्रेस कडून 2016 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नाही.

सुरेखा मोहन मेंडके‌ यांनी राहत्या घरी दुपारच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेखा मेंडके यांनी काँग्रेसकडून २०१६ मध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्या मोठ्या माताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यानंतर सुरूवातीला महिला व बालकल्याण उपसभापती म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली होती.

नगरसेविका सुरेखा मेंडके या आर्णी येथील नारायणलीला ले आऊट मध्ये रहात होत्या. मात्र रविवारी दुपारच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे यवतमाळच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नाही. पुढील तपास आर्णी पोलिस करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* मंगळवेढा येथे कोयत्याने खुनाचा प्रयत्न, आरोपीला ५ दिवसाची कोठडी

सोलापूर : मंगळवेढा-येथील आयसीआयसीआय बँकेचे जवळ भरदिवसा कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रामेश्वर महादेव कोळी (वय ३०रा. उचेठाण) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शनिवारी दिला .

शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रामेश्वर कोळी याने पूर्वीच्या भांडणावरून गजेंद्र महादेव शिवपुजे ( वय २९ रा. मुढवी) याच्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले होते .त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढ्याच्या पोलीसांनी रामेश्वर कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली .सहाय्यक निरीक्षक पिंगळे पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Corporator #commits #suicide #strangulation #custody, #नगरसेविका #गळफास #आत्महत्या #मंगळवेढा #हल्ल्या #आरोपीस #कोठडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गाय, शेण अन् गोमूत्राने अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते – मुख्यमंत्री
Next Article दुःखद ! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?