Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात दोन ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर शहरात दोन ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2022/06/20 at 10:12 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ घराबाहेर निघून जा म्हणून वृद्ध आईस मुलाकडून मारहाणस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□  शहरात ८ लाख ४१ हजाराची विदेशी दारु जप्त; दोघांना अटक

सोलापूर – शहरातील उत्तर कसबा आणि न्यू बुधवार पेठ परिसरात दोघा जणांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद विविध पोलिसात झाली आहे. Suicide by hanging at two places in Solapur city

त्यापैकी पहिली घटना काल रविवारी (ता. 19) रात्रीच्या सुमारास उत्तर कसबा येथे घडली. निलया मारुती सिंदखेडकर (वय ४७) असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. काल रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली. या मागचे कारण समजले नाही. हवालदार कामुर्ती पुढील तपास करीत आहे.

तर दुसरी घटना न्यू बुधवार पेठेतील रमांजली चौकाजवळ आज सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. नागेश दादाराव सोनकांबळे (वय ४५) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत .

 

□ घराबाहेर निघून जा म्हणून वृद्ध आईस मुलाकडून मारहाण

 

सोलापूर – तू माझ्या घरात राहू नको असे म्हणून वृद्ध मातेस मारहाण केल्याची घटना (दर्गनहळी ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. सुगलाबाई अण्णाराव बिराजदार (वय ८५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी (ता. 18) सकाळच्या सुमारास यांचा मुलगा सुरेंद्र बिराजदार याने आईला हाताने मारहाण करून ढकलून दिले होते. त्यात त्या जखमी झाल्या होत्या. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/565373551807045/

 

□  शहरात ८ लाख ४१ हजाराची विदेशी दारु जप्त; दोघांना अटक

सोलापूर – राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने आज रविवारी दिनांक पहाटेच्या सुमारास  गेंट्याल टाकीज चौक येथे सापळा रचून एका टेंपोतील गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा असा एकूण रुपये ८ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.

राज्य उत्पादनच्या भरारी पथकाने आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास  गेंट्याल चौक येथे टेंपो क्रमांक एमएच०४ ईबी ६०५० या वाहनाला अडवून त्याची तपासणी केली. असता त्यात  शिवा बाबू राठोड (रा. विजापूर) आणि इरेश गंगाधर नावडे (रा. भवानी पेठ सोलापूर) आढळून आले. त्यांच्या वाहनात गोवा राज्यात विक्रीस व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे  एकूण ११० बॉक्स आढळून आले. जप्त केलेल्या दारू ची किंमत ८ लाख ४१ इतकी आहे. वाहनासह  एकूण १४ लाख ४१ हजाराचा  माल  जप्त करण्यात आला.

अटक केलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सागर माळी (रा.मंद्रुप ता.दक्षिण सोलापूर) हा फरार असल्याचे सांगण्यात आले. राज्य उत्पादनचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार , दुय्यम निरीक्षक एस. ए. पाटील, सुरेश झगडे,  श्रीमती मिसाळ आदींनी ही कामगिरी केली.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/565096181834782/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Suicide #byhanging #two #places #Solapur #city #uttarkasba, #सोलापूर #शहरात #दोन #ठिकाण #गळफास #आत्महत्या #उत्तरकसबा #बुधवारपेठ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र हादरला ! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, मृतात डॉक्टर, शिक्षकाचा समावेश
Next Article Vidhanparishad भाजपचे 5 ही उमेदवार विजयी तर शिवसेनेची 3 मते फुटली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?