लखनऊ, 6 एप्रिल (हिं.स.)।आयपीएल स्पर्धेत शुक्रवारी(दि.५) झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंटसने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याला जबाबदार धरण्यात येत आहे. तर काहीजण तिलक वर्माला जबाबदार धरत आहेत. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध तिलक वर्माने अत्यंत संथ फलंदाजी केली. त्यामुळे हार्दिक पांड्या याने तिलक वर्मा याला परत बोलावून घेतले आणि त्याच्या जागी सँटनरला फलंदाजीसाठी मैदानात आणले. या निर्णयावरुन भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.
पहिली गोष्ट म्हणजे हार्दिकने तिलकला निवृत्त करत मिचेल सँटनरला फलंदाजीला आणले. तिलक हा चांगला सेट झाला होता आणि अखेरच्या षटकात तो मोठी फटकेबाजी करू शकला असता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हार्दिक पंड्यालाही यावेळी काही मोठे फटके मारता येत नव्हते. त्यामुळे तिलकला निवृत्त करण्यापेक्षा तो कर्णधार या नात्याने जबाबदारी स्विकारुन प्रथम निवृत्त व्हायला हवे होते. त्यामुळे हार्दिकने केलेल्या या गोष्टीला मुर्खपणाच म्हणता येईल, असे गावस्कर यांनी म्हटले.
मुंबई इंडियन्सला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 29 धावा करायच्या होत्या. त्यावेळी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा मैदानात होते. त्यामुळे 29 धावांचे हे लक्ष्य गाठणे पूर्णपणे शक्य वाटत होते नव्हते. पण 19 व्या षटकात शार्दुल ठाकूरने एलएसजीसाठी सामना फिरवला. तिलक वर्माने 23 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर संघाने त्याला रिटायर्ड आउट केले. 19 व्या षटकात तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला. तिलक वर्माच्या जागी आलेल्या मिचेल सँटनरला दोन चेंडूत फक्त दोन धावा करता आल्या. तिलक वर्माला माघारी बोलावण्याचा निर्णय अनेकांना रुचला नाही. हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, पण पुढच्याच चेंडूंवर त्याने जोरदार पुनरागमन केले आणि लखनौचा 12 धावांनी विजय निश्चित केला.