Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मटका प्रकरणात अखेर नगरसेवक सुनील कामाठीला अटक; २८८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मटका प्रकरणात अखेर नगरसेवक सुनील कामाठीला अटक; २८८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/09/23 at 1:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : मटका प्रकरणी गुन्हा दाखल असलेला मुख्य सूत्रधार भाजपचा नगरसेवक सुनील कामाठी हा अनेक दिवसांपासून फरार होता. याला अखेर सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास हैदराबाद येथे अटक केली.

न्यू पाच्छा पेठ कोंची कोरवी गल्ली येथील राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये २४ अॉगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली होती. पोलिसांना पाहून इमारतीमध्ये मटका घेणारे व अन्य कर्मचारी यांच्यामध्ये पळापळ होत असताना त्यात एका हिशोबनिसचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुनील कामाठीस सोलापुरात आणण्यात आले असून पुढील कारवाई केली जात आहे. मटका प्रकरणी मुख्य सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठी, पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी यांच्यासह ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये मटका बुकी सह मटका एजंट लाईनमन मिळून २८८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

* महिनांभरापासून शोध चालू होता

मटक्यातील मुख्य सहा भागीदारांपैकी पुतण्या आकाश कामाठी, पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी, सुरज कांबळे, इस्माईल मुछाले, शंकर धोत्रे या भागीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. सध्या इस्माईल मुछाले व सुरज कांबळे हे दोघे पोलीस कोठडीमध्ये आहेत. गेल्या महिनांभरापासून नगरसेवक सुनील कामाठी याचा शोध घेतला जात होता मात्र तो कुठेही आढळून येत नव्हता. तो हैदराबाद येथे राहात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मंगळवारी रात्री समजली होती. रात्रीतून पोलिसांनी हैदराबाद गाठून नगरसेवक सुनील कामाठी याला अटक केली.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #सुनीलकामाठी #भाजपा #नगरसेवक #अटक #मटका #प्रकरण #गुन्हेशाखा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर रेल्वे स्थानकास ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे नाव द्या; संसदीय अधिवेशनात मागणी
Next Article वाहनाच्या पीयुसीचे दर दुप्पट-तिप्पटीने वाढणार; दरवाढ १ अॉक्टोबरपासून लागू

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?