Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे

admin
Last updated: 2025/06/07 at 4:48 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

रायगड, 7 जून (हिं.स.) – मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर मला त्यामध्ये परिपक्वता आली. ज्या ज्या वेळेस तटकरे साहेबांचे जे चुकीचे निर्णय असतील त्यांच्याविरुद्ध आम्ही काही बोललो की कर्जतचे राष्ट्रवादीचे नेते एकत्र येतात आणि कोल्ह्या कुत्र्यांची पत्रकार परिषद घेतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण माझा राजीनामा मागतात. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जा असे बोलता हा काय बालिशपणा आहे. ह्या जनतेने मला निवडून दिलं. खरंतर तुमचे नेते सुनील तटकरे रायगड मधून निवडून आले त्यांना भरत शेठ, महेंद्र शेठ, योगेश कदम यांनी मदत केली. खरतर आधी तटकरेसाहेबांनी राजीनामा द्यावा मग मी राजीनामा देतो… नाहीतर तुमच्या नेत्यांनी आधी राजीनामा द्यायला पाहिजे व निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. तुम्हाला जर एवढीच खुमखुमी आहे तर आधी तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या, त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देतो व पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जायची माझी तयारी आहे, असे आव्हान शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले. ते कर्जत पोसरी येथे झालेल्या सभेत बोलत होते.

पराभव पराभव असतो तो शांतपणे स्वीकारा. ज्या ज्या चुका तुमच्या झाल्या त्याचे आत्मचिंतन तुम्ही स्वतः करा. मी ५७०० मतांनी मी निवडून आलो आहे. जनतेने मला तो कौल दिलेला आहे. सुधाकर या आधी मित्र होता. ज्या ज्या वेळी त्याच्यावर संकट आली तेव्हा मी त्याला मदत केली आहे. मग तो कोर्टाचा विषय असो की रुग्णालयाचा विषय असो. राजकीय मतभेद असू शकतात परंतु मी अशा प्रकारे गरळ कधीच ओतली नाही.

अशाप्रकारे चुकीचे राजकारण जर केले तर ते ह्या पुढे खपवून घेतले जाणार नाही. शिवसेना हा मतदार संघ एक केल्याशिवाय राहणार नाही.

पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही. मी शिवसेनेसाठी आतापर्यंत संघर्ष केला आहे मी कधीही राष्ट्रवादीसमोर झुकलेला नाही. आपण साऱ्यानी कर्जतच्या विकासाला प्राधान्य द्यावे.

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
Next Article आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?