Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुनीता विलियम्स ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार, क्रू १०मधील सहकाऱ्यांना पाहून आनंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

सुनीता विलियम्स ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार, क्रू १०मधील सहकाऱ्यांना पाहून आनंद

admin
Last updated: 2025/03/16 at 5:32 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन, 16 मार्च (हिं.स.)।मागील ९ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पुन्हा पृथ्वीवर घेऊन येणारे नासा आणि स्पेसएक्सचं क्रू १० मिशन अंतराळ स्थानकात पोहचलं आहे. हे यान दोघांना पुन्हा पृथ्वीवर घेऊन येणार आहे. नासा आणि स्पेसएक्सचं यान अंतराळात पोहचल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.

अंतराळात सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आणण्यासाठी फाल्कन ९ रॉकेटच्या माध्यमातून क्रू १० मिशन ड्रॅगन स्पेसक्राफ्ट सकाळी ९.४० मिनिटांनी अंतराळ स्थानकात पोहचले आहे. या यानातून अंतराळात जाणाऱ्या सदस्यांपैकी अमेरिकेचे २ अंतराळवीर एक मॉक्कलेन आणि निकोल आयर्स आहेत. त्याशिवाय जपानचे तुकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव हे देखील आहेत. या सर्वानी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची भेट घेतली. पृथ्वीवर परत नेण्यासाठी पोहचलेल्या अंतराळ यानातून उतरलेल्या इतरांना पाहून सुनीता आणि बुच यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. हे दोघेही त्यांच्या इतर अंतराळ सहकाऱ्यांना पाहून खुश झाले आणि गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांनी डान्स केला, जल्लोष केला.

क्रू १० सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्याकडे पोहचले आहेत. परंतु, आता काही दिवस ते अंतराळ स्थानकात काही माहिती जमा करतील. त्यानंतर आठवडाभरात सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर स्पेस एक्स कॅप्सूलच्या माध्यमातून इतर सहकाऱ्यांसोबत पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा आहे. जर वातावरण ठीक असेल तर स्पेस कॅप्सूल बुधवारी १९ मार्च आधीच स्पेस स्टेशनहून फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर लँड करेल.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप
Next Article विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी – सुधीर मुनगंटीवार

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?