Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: यूपीला निघालेल्या दीड कोटीच्या ‘सुपारी’ची सोलापुरात लावली परस्पर विल्हेवाट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

यूपीला निघालेल्या दीड कोटीच्या ‘सुपारी’ची सोलापुरात लावली परस्पर विल्हेवाट

Surajya Digital
Last updated: 2022/05/12 at 8:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

● माढ्यात कंटेनर थांबून असल्याने प्रकार आला उघडकीस

कुर्डूवाडी : कर्नाटकहून उत्तर प्रदेशकडे निघालेली व्हीआरएल लजिस्टिक लि. ट्रान्स्पोर्टच्या कंटेनर मधील २७ टन  अंदाजे दीड कोटी रुपयांच्या सुपारीचा दोन चालकाने सोलापुरात परस्पर विल्हेवाट लावली.  ही घटना मंगळवारी (ता. 10) दुपारी २.४० वाजताच्या सुमारास घडली. One and a half million out of UP ‘suparici Solapur made mutually disposal

हा प्रकार म्हैसगाव (ता. माढा ) येथे गाडी थांबून असल्याने उघडकीस आली. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात  व्हीआरएल लजिस्टिक लि. हुबळी कंपनीचे सोलापूर येथील असिस्टंट जनरल मॅनेजर केशव अनंतराव हिरासकर (मुळ रा. व्यंकटेशनगर विजापूर सध्या रा. भवानीपेठ सोलापूर) यांनी पोलिसात  फिर्याद दिली. चालक वसंतकुमार एस नारायणाप्पा (रा. बेंगलोर कर्नाटक) व चालक संतोष चंद्रप्पा एन्नर (रा. अंजीमनम जि. कर्नाटक) या दोघा संशयित चालकांवर  कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमित एन्टरप्रायझेस कर्नाटक यांचेकडून २७ टन २५० किलो वजनाची सुपारी घेऊन दि. ८ मे रोजी दुपारी २.४० वाजता हुबळीहून नोएडा उत्तरप्रदेश येथील धरमपाल सत्यपाल लि. या ठिकाणी पोहच करण्यासाठी गाडी ट्रक कंटेनर्स ( क्रमांक के. ए. २५ ए. ए. ०२५५) घेऊन निघाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

https://www.facebook.com/109399567404448/posts/539235811087486/

 

हुबळी येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयातून  कंटेनरचे जीपीएस लोकेशन पाहिले असता  ट्रक गेल्या १२ तासापासून कुर्डुवाडी – बार्शी रस्त्यावरील म्हैसगांव (ता. माढा) येथे रोडच्या कडेला उभी असल्याचे दाखवत होते.

दोन्ही चालकांच्या मोबाइलवर फोन केला असता बंद लागत होता. यामुळे हुबळी येथून सोलापूरच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात फोनवरून संपर्क करण्यात आला. फिर्यादी व त्यांचे सहकारी दिनेश गवशेट्टी  दोघे सदर गाडी उभी असलेल्या म्हैसगांव या ठिकाणी आले असता  कंटेनर आढळून आला. त्यामध्ये गाडीची कागदपत्रे होती. परंतू मालाची कागदपत्रे व दोन्ही चालक जागेवर नव्हते. गाडीच्या कंटेनरच्या मागणी दोन्ही लाॅकसह हिडन लाॅक सुद्धा तुटलेले होते व आत सुपारीचा माल दिसुन आला नसल्याने दोन्ही चालकांनी २७ टन सुपारीची  परस्पर विल्हेवाट लावली असल्याचे समोर आले.

यामुळे त्यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोघां जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत वाघमारे करीत आहेत.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/539335391077528/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #madha #mhaisgaon, #One #half #million #UP #suparici #Solapur #made #mutually #disposal, #यूपी #उत्तरप्रदेश #दीडकोटी #सुपारी #सोलापूर #परस्पर #विल्हेवाट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या जागांसाठी 10 जूनला मतदान
Next Article national anthem सर्व मदरशांमध्ये रोज राष्ट्रगीत म्हणावे लागणार, योगी सरकारचे आदेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?