Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सूरत – चेन्नई महामार्ग भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सूरत – चेन्नई महामार्ग भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार

Surajya Digital
Last updated: 2022/11/18 at 10:00 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ सूरत – चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार

□ भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

Contents
□ सूरत – चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार□ भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

सोलापूर : सूरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी लवकरात लवकर भूसंपादन करावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. Surat-Chennai highway land acquisition work will be completed by the end of December Solapur Guardian Minister Radhakrishna Vikhe-Patil

नियोजन भवन सोलापूर येथे सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग व शहरातील उड्डाणपूल संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, सूरत चेन्नई महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. शेत पिकांसाठी भूमिगत वाहिनी काढण्याबाबतचे अंतर कमी राहील, याची दक्षता घ्यावी. सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलांसंदर्भात शासकीय जागांबाबत तात्काळ मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 18 गावे, उत्तर सोलापुर तालुक्यातील 8 गावे, दक्षिण सोलापुरातील 16 गावे व अक्कलकोट तालुक्यातील 17 गावे अशी एकूण 59 गावातील भूसंपादन करण्यात येणार आहे. मोजणीसाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी विविध विभागांची चार पथके तयार करून रोव्हरच्या साह्याने मोजणी करण्यात आली आहे. तसेच या पथकामार्फत जाग्यावरच शेतकऱ्यासमक्ष पंचनामे देखील करण्यात आले आहेत. सूरत- चेन्नई भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापूर शहरातील जुना पुना नाका ते पत्रकार भवन चौक व जुना बोरमणी नाका ते मोरारका बंगलापर्यंत दोन उड्डाणपूल होणार असून, हे दोन उड्डाणपूल 10.450 किमीचे होणार आहेत. या अंतर्गत येणाऱ्या 11 शासकीय विभागांच्या जागा तात्काळ मिळाव्यात, यासाठी शासनस्तरावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी सूरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावर करण्यात येणाऱ्या कामांची व देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी चिटणीस यांनी यावेळी दिली.

You Might Also Like

डॉ. वळसंगकर प्रकरण : २५ दिवस लोटले तरी पोलिसांच्या हाती काहीच नाही

सोलापुरात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच खासदार झाले – प्रणिती शिंदे

सोलापूरात गुटखा मिळतोय सर्रास दुकाने-टपर्‍यांवर

भारतीय सैन्यदलापुढे पाकला गुडघे टेकावे लागले – प्रणिती शिंदे

TAGGED: #Surat-Chennai #highway #land #acquisition #work #completed #end #December #Solapur #GuardianMinister #RadhakrishnaVikhe-Patil, #सोलापूर #सूरत #चेन्नई #महामार्ग #भूसंपादन #काम #डिसेंबरअखेर #पूर्ण #पालकमंत्री #राजकारणविखे-पाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधींना उत्तर, देवेंद्र फडणवीसांचे सलग 13 ट्विट
Next Article टिकेला उत्तर देण्यासाठीच बोललो, आमच्या चारित्र्यावर बोलू नका; राजन पाटलांचे उमेश पाटलांना ओपन चॅलेंज

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?