Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Solapur doctor रोटरीच्या 43 सर्जन्सकडून काश्मीरमध्ये आठ दिवसात २४९९ शस्त्रक्रिया
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

Solapur doctor रोटरीच्या 43 सर्जन्सकडून काश्मीरमध्ये आठ दिवसात २४९९ शस्त्रक्रिया

Surajya Digital
Last updated: 2022/06/18 at 5:12 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ सोलापुरातील १६ डॉक्टरांचा सहभागस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ यांनी बजावली सेवा

□ सोलापुरातील १६ डॉक्टरांचा सहभाग

सोलापूर : महाराष्ट्रातील रोटरी क्लबच्या ४ जिल्हा शाखांच्या ४३ सर्जन्सकडून काश्मीरमध्ये आठ दिवसात २ हजार ४९९ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. राजीव प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या शिबिरात सोलापुरातील १६ डॉक्टरांचा सहभाग होता तर या उपक्रमाच्या खर्चाचा विचार केल्यास 50 कोटींच्यावर जाऊ शकतो, असेही प्रधान म्हणाले. Solapur doctors participate in 2499 surgeries in Kashmir in eight days by 43 Rotary surgeons

काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, सोपोर आणि गंदरबल अशा चार जिल्हा सहकारी रुग्णालयात या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. विशेष बाब म्हणजे शस्त्रक्रिया झालेल्या २,४९९ रुग्णांपैकी एकालाही शस्त्रक्रियानंतर गुंतागुंत झालेली नाही. श्रीनगरचे विभागीय आयुक्त आणि मूळचे महाराष्ट्रीयन असलेले पांडुरंग पोळे यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला.

११ ते १८ मे या दरम्यान झालेल्या मोफत शिबिरात कर्करोग, अस्थीरोग, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा, डोळे, दंत सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, मूत्र विकार अशा ११ प्रकारातील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. काश्मीरचे विभागीय आयुक्त पांडुरंग पोळे यांचे  ‘मायक्रो प्लॅनिंग’ यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.

 

रोटरी जिल्हा ३१३२ ( सोलापूर, सातारा, नगर ,मराठवाडा ),रोटरी जिल्हा ३१३१ ( पुणे, आणि रायगड ) तसेच ३०७० आणि ३०६० अशा ४ रोटरी डिस्ट्रिक्टच्या संयुक्त विद्यमाने आणि काश्मीर महसूल विभागातील चार जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या सहकार्याने ११ ते १८ मे दरम्यान मोफत शिबिरात या विक्रमी २,४९९ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या असल्याची माहिती सोलापूरचे प्रकल्प संचालक डॉक्टर राजीव प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

काश्‍मीरमध्ये विभागीय आयुक्त पोळे यांनी आठ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने घरोघरी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पाठवून शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या ९ हजारावर रुग्णांची नोंद केली. रोटरीचे प्रकल्प संचालक सोलापूरचे डॉक्टर राजीव प्रधान आणि पनवेलचे प्रकल्प समन्वयक डॉक्टर गिरीश गुणे यांनी सप्टेंबर २०२१ पासून म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून प्रकल्पाचे नियोजन केले होते. तीन डॉक्टरांच्या पथकाने काश्मीरमध्ये जाऊन प्रत्यक्ष सरकारी रुग्णालयांची पाहणी केली.

या रुग्णालयांमधील उपकरणे, उपलब्ध स्टाफ आणि ऑपरेशन थिएटर्सची संख्या अशा सर्व बाबींचा विचार करता शस्त्रक्रिया शिबिराचे हे शिवधनुष्य पेलणे अवघड होणार असल्याचे डॉक्टर प्रधान आणि डॉक्टर पुणे यांना जाणवले. त्यांनी पुन्हा विभागीय आयुक्त पोळे यांच्याशी संपर्क साधून काश्मीरच्या चार जिल्हा सरकारी रुग्णालयात शिबिराच्या पंधरा दिवसांसाठी ओटी असिस्टंट, नर्सेस असा १५० जणांचा स्टाफ स्टाफ पाठविण्याचा निर्णय घेतला.

आसपासच्या जिल्ह्यातून रुग्णवाहिका आणि व उपकरणे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शिबिरामध्ये रुग्णांवर या शस्त्रक्रिया पार पडल्या. १३ मे रोजी शिबिराच्या तिसऱ्या दिवशी काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर महामहीम मनोज सिन्हा यांनी सोपोर येथे या शिबिराचे अनौपचारिक उद्घाटन केले. तसेच रोटरी प्रकल्पातील सर्जन टीमचे त्यांनी विशेष कौतुक केले.

□ यांनी बजावली सेवा

सोलापुरातून या शिबिरासाठी डॉक्टर संजय मंठाळे, डॉक्टर सौरभ ढोपरे, डॉक्टर शशिकांत गुंजाळे, डॉक्टर उमा प्रधान यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी सेवा बजावली. तर डॉक्टर ओम मोतीपावले,स्वाती हरकाल, हरीश मोटवानी आणि रवींद्र साळुंखे यांनी या प्रकल्पाचे स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवला.

काश्मीरमधील धगधगत्या या अशांत परिसरामध्ये रोटरीच्या शिबिरात सहभागी झालेल्या डॉक्टर मंडळींनी आठ दिवस आपले दवाखाने बंद ठेवून रुग्णांवर उपचार करून शस्त्रक्रिया करण्याची सेवा बजावली. या शिबिरात सोलापुरातील १६ डॉक्टरांचा सहभाग होता. या संपूर्ण आरोग्यसेवेच्या प्रकल्प खर्चाचा विचार केला तर तो ५० कोटींच्यावर जाऊ शकतो, असेही डॉक्टर प्रधान यावेळी बोलताना म्हणाले.

 

 

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

TAGGED: #Solapur #doctors #participate #surgeries #Kashmir #eightdays #Rotary #surgeons, #रोटरी #सर्जन्स #काश्मीर #आठदिवस #शस्त्रक्रिया #सोलापूर #डॉक्टर #सहभाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही; 8 वर्षांपूर्वीची उधारी द्या’
Next Article Agneepath Scheme अग्निपथ – पुन्हा बदल, मोदी सरकारची घोषणा; आतापर्यंतचे सर्वात गोंधळलेले पंतप्रधान

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?